Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल ते पपया नर्सरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी, तुंबलेल्या गटारी आणि सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2026 | 05:23 PM
त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना?
  • आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा
  • तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा
नाशिक: शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, आज त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल ते पपया नर्सरी या मार्गावर प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नाशिकमधील  सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या या मुख्य मार्गावर वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी (दि. २१) पाहायला मिळाले, या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून, दररोज तिथे कमी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास वाहनचालकांची सत्वपरिक्षा होते. नियोजनात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांकडून मात्र, तीव्र संताप होतो आहे. पाऊस सुरू होताच या मार्गावरील खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा न होता ते रस्त्यावरून वाहत आहे. पाणी आणि चिखलामुळे वाहनचालकांना गाड्यांचा वेग अत्यंत कमी करावा लागत आहे. सातपूर अंबड लिंकरोडवरून येणारी वाहने आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक पपया नर्सरी चौकात एकत्र आल्याने तसेच वाहनचालकांनी लेनची शिस्त न पाळल्याने या भागात प्रचंड ‘डेड लॉक’ निर्माण झाला.

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

उद्योजक आणि कामगारांना मोठा फटका

हा रस्ता औद्योगिक वसाहतीसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, आज कंपन्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत कंपनी बसेस, दुचाकी आणि अवजड वाहने एकाच वेळी अडकून पडली. वाहतूक पोलिसांनी पायसात उभे राहून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही अंतर्गत रस्त्यांवरील दबावामुळे वाहतूक सुरळीत होण्यास कमालीचा वेळ लागला. पाऊस सुरू झाला की दरवेळी या रस्त्याची अशीच बिकट अवस्था होत असल्याने महापालिका आणि संबंधित प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सुरळीत वाहतुकीसाठी तोडगा काढावा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

महामार्ग बनला घसरगुंडी

मुंबई-आग्रा महामार्गावर पावसाळ्यात चिखलामुळे वाहने घसरण्याची मालिका सलग सहाव्या वर्षीही सुरूच आहे. मंगळवारी (दि. २१) रिमझिम पावसामुळे मुंबई नाक्याकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वडाळा नाका ते द्वारका सिग्नलदरम्यान रस्ता अत्यंत निसरडा झाला. परिणामी, दिवसभरात ५० हून अधिक दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या. काही दुचाकीस्वार जखमी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) आणि अग्निशमन दलाच्च्या पथकांना पाचारण करावे लागले. दोन्ही पथकांनी धाव घेत रस्ता धुऊन चिखल साफ केला, तर पोलिसांनी बॅरिकेडिंग करत वाहतूक वॉर्डनच्या मदतीने दुचाकीस्वारांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले. द्वारका परिसरात सध्या ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम सुरू असल्याने तेथील माती अवजड वाहनांच्या चाकांना लागून महामार्गावर पसरत आहे. त्यातच उड्डाणपुलावरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे या मातीचा चिकट चिखल तयार होत आहे. तसेच वडाळा नाका ते द्वारका दरम्यानचा सर्व्हिस रोड खोदल्यामुळे तेथील मुरूम-माती रस्त्यावर येऊन दुचाकींची घसरगुंडी होत आहे.

उद्योजक आणि कामगारांना मोठा फटका

हा रस्ता औद्योगिक वसाहतीसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, आज कंपन्या सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत कंपनी बसेस, दुचाकी आणि अवजड वाहने एकाच वेळी अडकून पडली, वाहतूक पोलिसांनी पावसात उभे राहून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही अंतर्गत रस्त्यांवरील दबावामुळे वाहतूक सुरळीत होण्यास कमालीचा वेळ लागला. पाऊस सुरू झाला की दरवेळी या रस्त्याची अशीच बिकट अवस्था होत असल्याने मनपा तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सुरळीत वाहतुकीसाठी तोडगा काढावा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

Nashik Crime: PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; प्रेमप्रकरणाचा संशय

Web Title: Nashik traffic jam on tryambak road after rain waterlogging and roadwork

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Nashik
  • rain
  • traffic jam

संबंधित बातम्या

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
1

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
2

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.