
फोटो सौजन्य सोशल मिडिया
हा अपघात 18 आँक्टोबर रोजी रात्री 2 च्या सुमारास झाला. नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कारने प्रथम एका मोटारसायकल स्वाराली धडक दिली. या नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला आणि रस्त्याच्या मधोमध उभारलेल्या पोलीसांच्या बॅरिकेड्सला जोरदार धडक लागूण कार थेट पोलीसावर आदळली. यात कार चालकाने नांदुरी येथे पोहोचण्यापूर्वी इतर काही वाहनांना सुद्धा धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
नवरात्र सुरू असल्यामुळे नवरात्रीची सातवी माळ असल्याने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. यासाठी नांदुरी येथील अभोणा चौफुलीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 18 आँक्टोबरच्या मध्यरात्री अंदाजे २ वाजता नाशिक- वणी बाजूकडून येणाऱ्या एका भरधाव कारने (Maruti Ciaz) हा मोठा अपघात घडवला.
मारुती सियाझ कारने नांदुरी टी-पॉईंटजवळ आधी एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर कार चुकीच्या बाजूने जात समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला घासून थेट रस्त्यावरील पोलीस बॅरिकेड्स तोडून बंदोबस्तावरील पोलिसांवर व भाविकांवर जाऊन धडकली.
या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे PSI विजय गायकवाड यांचे निधन झाले. त्यांच्यासोबतच पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत, एपीआय दिनकर मुंडे यांच्यासह 11 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालय आणि नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.