Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

२,४०० प्रति क्विंटल या आधारभूत किंमतीने शेतकऱ्यांकडून मका यंदा शासन खरेदी करणार आहे . या सगळ्या सावळ्या गोंधळात आधारभूत किंमतीने केली जाणारी मका खरेदी लांबणीवर पडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 25, 2025 | 06:09 PM
आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

आधारभूत किंमतीची मका खरेदी पडणार लांबणीवर, खरेदीसाठी राज्य शासनाकडून तारीख पे तारीख

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्य शासनाने आधारभूत किंमतीने मका खरेदी
  • शेतकऱ्यांकडून नोंदणीला प्रतिसाद न मिळाल्याने खरेदी सुरु
  • माल खुल्या बाजारात ‘बेभाव’ विकावा लागत
प्रशांत काळे । नाशिक: नोव्हेंबर महिना जवळपास संपत आला तरी, राज्य शासनाने आधारभूत किंमतीने मका खरेदी करण्यासाठी, अद्याप उद्दिष्टच निश्चित केले नाही. तसेच शेतकऱ्यांकडून नोंदणीला प्रतिसाद न मिळाल्याने खरेदी सुरु होऊ शकली नाही, असे कारण पुढे करत खरेदीसाठी शासनाकडून तारीख पे तारीख जाहीर केली जात आहे. या सगळ्या सावळ्या गोंधळात आधारभूत किंमतीने केली जाणारी मका खरेदी लांबणीवर पडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आपला माल खुल्या बाजारात ‘बेभाव’ विकावा लागत आहे. यामुळे शासनाचे मका हमीभाव केंद्र कधी सुरु होणार, याकडे जिल् डभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

अतिवृष्टीच्या आस्मानी संकटानंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता, सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदा नोव्हेंबर महिना उजेडला तरी शासनाची हमीभाव केंद्र सुरु होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मका बेभावाने विकण्याची वेळ आलेली आहे.

यंदा शासन २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल या आधारभूत किंमतीने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करणार आहे. सध्या खुल्या बाजारात मका पिकाला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे, जो की आधारभूत किंमतीपेक्षा ९०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील शेतकऱ्यांची होणारी हि लूट थांबवण्यासाठी शासनाने तात्काळ हमीभाव केंद्रे सुरु करावे, अशी मागणी होत आहे.

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

यंदा कृषी विभागाच्या आवाहलानुसार नाशिक जिल्ह्यात ४ हजार ८२ हेक्टरवर मका पेरणी झालेली आहे. अद्याप शासनाला मका उत्पादनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण उत्पादनावरच खरेदीचे उद्दिष्ट निश्चित होणार आहे. खरेदीचे उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर ल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरेदीचे आदेश प्राप्त होणार आहे. सरकारी काम आणि चार दिवस थांब, असाच काहीसा प्रकार मका हमीभाव खरेदी बाबत सध्या तरी दिसून येत आहे. यात शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

नोंदणीला प्रतिसाद नसल्याचे स्पष्टीकरण फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात खरेदी ३ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत केली जाणार होती. परंतु, शासनाच्या सल्लागार समितीकडून या दरम्यान खरेदीबाबत कोणताही आदेश जिल्हा फेडरेशन अर्थात जिल्हा पणनला प्राप्त न झाल्याने खरेदी लांबणीवर पडली आहे. या प्रश्नी मात्र फेडरेशन सावरा सावर करतांना दिसत असून नोंदणीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच खरेदी सुरु झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे.

१७ केंद्र खरेदीसाठी केले मंजूर

जिल्ह्यात आधारभूत किमतीने मका खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकान्यांनी १७ केंद्रांना मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर मका, बजरी, रागी, ज्वारी (संकरित, मालदांडी। खरेदी केली जाणार असून ३० नोवोबरपर्यंत नेमून दिलेल्या केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नौदगी किती झाली यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खरेदी सुरु होईल. किती मका खरेदी करायची या बाबत अजून स्पटता नाही, शासनाकडून आदेश प्राप्त होताच खारेदी सुरु केली जाईत,
– बी. आर. पाटील, जिल्हा पणन अधिकारी,

आतापर्यंत मका खरेदी सुरु होणे अपेक्षित होते. खरे तर शासनाकडे हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणाच उपलब्ध नाही. हमीभावाने खरेदी करण्यापेक्षा भावांतर योजना योग्य पर्याय आहे. हि योजना राबवली तर शेतकऱ्यांना खऱ्या फायदा होईल.
-अर्जुन बोराडे, शेतकरी समन्य समिती,

Nagpur Politics: नागपुरात त्रिकोणी लढत; राजू भोयर यांनी उमेदवारी सोडली

Web Title: The purchase of maize at the basic price will be delayed with the state government repeatedly giving dates for the purchase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • state government

संबंधित बातम्या

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
1

Eknath Shinde : “विकास विरोधी प्रवृत्ती हद्दपार करा…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Maharashtra Local Body Election : धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह
2

Maharashtra Local Body Election : धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?
3

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
4

Eknath Shinde : “खुर्ची आमचा स्वार्थ नाही तर खुर्चीवर…”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.