
Latur Politics: लातूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का! पंडितराव धुमाळ शिंदे गटात दाखल
Latur Politics: लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंडितराव धुमाळ यांनी राष्ट्रवादी व इतर पक्षातल्या अनेक कार्यकत्यांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी सेनेचा गमजा घालून शिवसेनेत प्रवेश दिला. मूळचे काँग्रेसचे असलेले पंडितराव धुमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपली कार्यकीर्द गाजविली. प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन त्यांनी हे पद पटकाविले होते. ते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे समर्थक होते. त्यांनी जि. प. चे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
लालबहादूर शास्त्री मिशनचे ते अध्यक्ष आहेत.
हेही वाचा: Latur News: लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावर पेच! राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
नुकतेच त्यांना कझाकिस्तानातील अलमाटी येथे ‘नवभारत’ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ग्लोबल अॅक्सलन्स अॅवॉर्ड देऊन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंडितराव धुमाळ यांना गौरविण्यात आले होते. पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, उदगीर विधानसभेचे माजी आ. सुधाकर भालेराव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख रवी गुरमे उपस्थित होते. यावेळी निलंगा तालुक्यातील उल्हास सूर्यवंशी, महेश चव्हाण, गहिनीनाथ राजे, बाबुराव आंबेगावे, व्यंकट पन्हाळे, संतोष पन्हाळे, संजय बिरादार, गजेंद्र पिंपळे यांच्यासह अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
राजकारण कमी पण समाजकारण जास्त करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून शिवसेना मजबूत करावे, असे आवाहन संजय मोरे यांनी केले. पंडितराव धुमाळ यांनी निलंगा, औसा, देवणी या तालुक्यामध्ये शिवसेनेचा झंजावात निर्माण करू, असा विश्वास व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. सध्या येऊ पाहणाऱ्या निवडणुकीमध्ये हा प्रवेश काय राजकीय वेगळे वळण घेऊ येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या मतभेदमुळे राजकीय चर्चांना उधाण येत असल्याचे दिसून येत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.