Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवभारत’ ‘महाराष्ट्र पहिला’ कॉनक्लेव 2024: राज्याला देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनोमी बनवणार ! देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

नवभारत ‘महाराष्ट्र पहिला कॉन्क्लेव्ह 2024’ या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.  "महाराष्ट्राला पुढील पाच वर्षात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनोमी बनवायचे आहे." असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी व्यक्त केला.

  • By नारायण परब
Updated On: Aug 01, 2024 | 10:18 PM
‘नवभारत’ ‘महाराष्ट्र पहिला’ कॉनक्लेव 2024: राज्याला देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनोमी बनवणार ! देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील आघाडीचे हिंदी वृत्तपत्र नवभारत आणि मराठी दैनिक नवराष्ट्र यांच्या पुढाकाराने आज (1 ऑगस्ट) ‘महाराष्ट्राचा पहिला कॉन्क्लेव्ह 2024’ या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राज्यासंबंधी रोडमॅप सांगितला ते म्हणाले की, “महाराष्ट्राला पुढील पाच वर्षात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनोमी बनवायचे आहे.  देशाच्या ‘अर्थव्यवस्थेचे मॅगनेट’ बनवण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा समतोल विकास महत्वाचा आहे.”

महाराष्ट्राच्या रोडमेपवर बोलतानाच फडणवीस यांनी आपल्या शासन काळातील वेगाने झालेल्या आणि होत असलेल्या विकासावर भाष्य केले ते म्हणाले “मी मुख्यमंत्री बनल्यानंतर ट्रांन्स हार्बर लिंक प्रकल्प 5 वर्षात पूर्ण केला. हा मार्ग सर्वांना अशक्य वाटत होता मात्र केंद्र सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प आम्ही करुन दाखवला. नवी मुंबईचे एअरपोर्टवर पुढील 2 महिन्यात फ्लाईट लॅंड होईल. येत्या मार्चपर्यंत एअरपोर्ट पूर्णपणे तयार असेल. महाराष्ट्रातील 30 टक्के स्टील हे गडचिरोलीमध्ये बनणार आहे. त्यामुळे गडचिरोली भविष्यातील स्टील सीटी असणार आहे. वाढवण बंदरामध्ये जगातील सर्वात मोठी जहाज पण येऊ शकते इतकं मोठे बंदर बांधले जात आहे.”

देवेंद्र फडणवीस यांनी केले कॉंनक्लेवचे कौतुक 

नवभारत आणि नवराष्ट्राने आयोजित केलेल्या या कॉनक्लेवचे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले त्यावेळी ते म्हणाले की,  “नवभारत हे माझे घर आहे. त्यामुळे इथे आल्यावर घरात आल्यासारखे वाटते आहे. या कॉनक्लेवमध्ये चांगल्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच देशातील सर्वात वेगवान अत्याधुनिक एमआरआय मशिनचेही अनावरण करण्यात आले. त्यामुळे हा एक पावरपॅक्ट कॉनक्लेव होता जो नवभारत आणि नवराष्ट्राने आयोजित केला त्याबद्दल अभिनंदन.”

 या नेत्यांचा सहभाग आणि संवाद

या कॉनक्लेवमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले, नेते अतुल लोंढे, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल प्रधान,पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त मंगेश चितळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव अविनाश ढाकणे इत्यांदीनी सहभाग घेतला.   नवभारत ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह’च्या दुसऱ्या आवृत्तीत पहिल्या थीममध्ये 2030 पर्यंत महाराष्ट्रातील पुढील पिढीची पायाभूत सुविधा’, 2024 मध्ये महाराष्ट्रातील महाभारत, शहरी महाराष्ट्राचा पायाभूत सुविधा विकास आणि महाराष्ट्र @ 2030 या विषयांचा समावेश होता.  देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका काय आहे आणि भविष्यात काय घडू शकते, याचा आराखडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला.

Web Title: Nav bharat maharashtra first conclave 2024 making the state the countrys first trillion dollar economy devendra fadnavis determination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 10:18 PM

Topics:  

  • Conclave
  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Navrashtra

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
1

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

‘हो मी फोन केला’… देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आली रंगत
2

‘हो मी फोन केला’… देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आली रंगत

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र
3

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
4

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.