Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

Ahilyanagar Kalyan Highway: कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटातील धोकादायक रस्त्याच्या समस्येवर 'नवराष्ट्र'ने सातत्याने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने अखेर रस्ता दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 28, 2026 | 11:52 AM
करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; 'नवराष्ट्र'च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; 'नवराष्ट्र'च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • करंजी घाटातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात
  • ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
  • करंजी घाटात रस्ता व संरक्षक भिंतीच्या कामाला वेग
 

पोपट पिटेकर, अहिल्यानगर: कल्याण-विशाखापट्टणम या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटातील धोकादायक रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रशासनाने सुरुवात केली आहे. या प्रश्नावर ‘नवराष्ट्र’ने सातत्याने वृत्तांकन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाल करत रस्ता दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीच्या उभारणीचे काम सुरू केले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी घाटात मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत महामार्गाचा जवळपास अर्धा भाग खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. अरुंद झालेल्या रस्त्यामुळे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. विशेषतः पावसाळ्यात हा मार्ग अधिक धोकादायक बनल्याने मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.

Navarashtra Impact : नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर

या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थानिक आमदार मोनिका राजळे यांनी राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात हा विषय सभागृहात उपस्थित केला होता. रस्ता दुरुस्तीचे काम रखडल्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी सरकारकडे केली होती. दरम्यान, ‘नवराष्ट्र’ने करंजी घाटातील धोकादायक परिस्थिती, नागरिकांच्या हालअपेष्टा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने लावून धरला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी काम सुरू करत रस्ता दुरुस्तीबरोबरच संरक्षक भिंतीचे बांधकामही हाती घेतले आहे. कामाला सुरुवात झाल्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणारे वाहनधारक, व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून करंजी घाटातील वाहतूक पूर्णपणे सुरक्षित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 (NH-222) म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्क्रमांकनानंतर या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग 61 (NH-61) असे नाव देण्यात आले.

आर्थिक आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्व

मुंबई महानगर परिसर आणि मराठवाडा यांच्यातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग.

शेतीमाल, साखर, कापूस, धान्य, फळे आणि औद्योगिक मालवाहतुकीसाठी अत्यंत उपयोगी.

महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या मालवाहतुकीचा प्रमुख कॉरिडॉर.

अनेक धार्मिक आणि पर्यटनस्थळांना जोडणारा मार्ग असल्याने वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

करंजी घाटाचे महत्त्व

Karanji Ghat हा या महामार्गावरील संवेदनशील घाट विभाग आहे. मुसळधार पावसामुळे येथे दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक कोंडीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे या भागात संरक्षक भिंती, उतार स्थिरीकरण (Slope Protection), पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नियमित रस्ता दुरुस्तीची आवश्यकता असते.

Water Crisis Impact : नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

Web Title: Navarashtra impact karanji ghat road repair work begins after news report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • maharashtra
  • Navarashtra Impact

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
1

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
2

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
4

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.