Navarashtra Influencer Summit 2026
Navarashtra Influencer Summit 2026: डिजिटल विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी देखील सर्वात पहिले लागतं ते म्हणजे सातत्य आणि सतत नवीन काहीतकी करण्य़ाची इच्छा. पण फक्त इच्छा असून चालत नाही तर पाहिजे तसं काम होणं देखील महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे ते संयम आणि काहीसा वेळ देणं. आज असे बरेच कॉन्टेंट क्रिएटर आहेत ज्यांनी खूप चांगले कॉन्टेंट सोशल मीडियावर आणलेत आणि नेटकऱ्यांनी देखील त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला. म्हणूनच अशा क्रिएटर्स, इन्फ्लुएंसर्स आणि कंटेंट मेकर्सना नवराष्ट्र देतंय हक्काचा प्लॅटफॉर्म.
डिजिटल विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या क्रिएटर्स, इन्फ्लुएंसर्स आणि कंटेंट मेकर्ससाठी ही एक सुवर्णसंधी असून आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. Navarashtra Influencer Summit 2026 साठी नॉमिनेशनची अंतिम तारीख १० मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. हा मंच त्या व्यक्तींसाठी आहे जे आपल्या कंटेंट, क्रिएटिव्हिटीतून सोशल मीडियालर लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की, तुमच्या क्रिएटीव्हिटीसाठी तुम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळावं तर स्वतःची ओळख मोठ्या मंचावर पोहोचवण्याची हीच योग्य वेळ आहे .मग विचार कसला करताय उशीर करू नका आजच नॉमिनेट करा आणि महाराष्ट्राच्या पुढील प्रभावशाली डिजिटल चेहऱ्याचा हिस्सा व्हा. नॉमिनेशनसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर फॉर्म भरु शकता.
https://www.navarashtra.com/digitalinfluencersummit2026/






