Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथमच नवी मुंबईचा विकास आराखडा जाहीर; हरकती-सूचना मागवण्यासाठी खुला

नवी मुंबई पालिकेच्या स्थापनेपासून पहिली विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार जनतेच्या सूचना आणि हरकती मागविण्याकरिता १० ऑगस्ट २०२२ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप विकास योजनेच्या अनुषंगाने हरकती-सूचना असल्यास प्रारूप विकास योजनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या ६० दिवसांच्या आत द्याव्या लागणार आहेत.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 12, 2022 | 08:48 AM
प्रथमच नवी मुंबईचा विकास आराखडा जाहीर; हरकती-सूचना मागवण्यासाठी खुला
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेची (NMMC) १९९२ मध्ये स्थापना होऊनही आजतागायत विकास आराखडा (Development Plan) तयार केला गेला नव्हता. २०१८ मध्ये महासभेत सर्वानुमते मंजूर होऊन शासनाला पाठवलेला व राजकारणात अडकलेल्या विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी (Approval) देण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने हरकती व सूचना (Objections and Suggetions) मागवण्यासाठी हा विकास आराखडा खुला केला आहे.

नवी मुंबई पालिकेच्या स्थापनेपासून पहिली विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार (Maharashtra Regional Planning and Town Planning Act) जनतेच्या सूचना आणि हरकती मागविण्याकरिता १० ऑगस्ट २०२२ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रारुप विकास योजनेच्या अनुषंगाने हरकती-सूचना असल्यास प्रारूप विकास योजनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या ६० दिवसांच्या आत द्याव्या लागणार आहेत.

प्रारुप विकास योजनेच्या प्रस्तावामध्ये एकूण ६२५ आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. सदरची आरक्षणे ही उद्यान, खेळाचे मैदान, विविध शैक्षणिक- सामाजिक सुविधा, मार्केट आदी सुविधांकरिता प्रस्तावित आहेत. नियोजनाच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या ठिकाणी मिसींग लिंक, सर्व्हिस रोड, रस्ते रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सिडको विकासित इमारतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने सदर पुनर्विकासाला चालना मिळावी याकरीता सिडको विकसित कंडोमिनियमलगत रस्त्यांचे आवश्यक त्या ठिकाणी रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाकरीता विविध ठिकाणी आरक्षणे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

विकासासाठी प्रस्तावित बाबी

  • नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीलगत खाडी किनारी उपलब्ध रुंदीच्या अनुषंगाने १५.०० ते ३४.०० मी. रुंदीपर्यंतचा सागरी रस्ता (कोस्टल रोड) प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
  • घणसोली सेक्टर १२ व १३ येथे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाकरिता साधारणत: ७५ एकर क्षेत्रावर आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
  • वाशी सेक्टर १९ ए मध्ये म्युझियमकरिता आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
  • ऐरोली सेक्टर १० ए मध्ये सुमारे १२ एकर क्षेत्रावर लेझर पार्क, बोटॅनिकल गार्डन व रिसर्च सेंटर करिता आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
  • सानपाडा येथे सेंट्रल लायब्ररी करिता भूखंड आरक्षित करण्यात आलेला आहे.
  • पार्किंगसाठी १२५ प्लॉट्स आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.
  • नियोजनाच्या दृष्टीकोनातून शक्य आहे त्या ठिकाणी नागरिकांकरिता सायकल ट्रॅक प्रस्तावित

प्रस्तावित ६२५ आरक्षणांचे स्वरूप
आरक्षणांचे प्रयोजन। आरक्षणांची संख्या
रिक्रियेशनल (उद्यान, खेळाचे मैदान इ.) – १४४
शैक्षणिक (शाळा, महाविद्यालय इ.) – ३५
आरोग्य (हॉस्पिटल, नागरी आरोग्य केंद्र)- ३२
सार्वजनिक सुविधा (फायर स्टेशन, सरकारी कार्यालये, महापालिका विभाग कार्यालये)- ६६
सामाजिक व सांस्कृतिक प्रयोजन (समाजमंदिर, वाचनालय, जीम, व्यायामशाळा, मंगल कार्यालये)- ७९
इन्स्टिट्युशनल (होस्टेल, म्युझियम)- ८
सार्वजनिक उपक्रमांकरिता – ३८
वाणिज्य वापराकरिता (मार्केट स्टॉल इ.) – ९४
परिवहन वापराकरिता (बस डेपो, पार्किंग इ.)- १२९
एकूण आरक्षणांची संख्या – ६२५

वाढत्या लोकसंख्येला आरक्षणे उपयुक्त ठरतील
एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार उपलब्ध होणारे अतिरिक्त चटई क्षेत्र लक्षात घेता येत्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. या विकासामुळे नागरी सुविधांवरील ताण वाढणार आहे. या नागरी सुविधांचा वाढत्या लोकसंख्येला आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आरक्षणे निश्चित उपयुक्त ठरतील, असे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Web Title: Navi mumbai development plan announced for the first time cause open to call for objections nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 08:48 AM

Topics:  

  • Development Plan
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
2

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Devendra Fadnavis: “पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Devendra Fadnavis: “पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.