Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

एपीएमसी प्रशासनाने दाणा व मार्केटमधील तब्बल १२०० ते १५०० व्यापाऱ्यांना थकीत १ टक्का सेवा शुल्काबाबत वसुली करण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अशा प्रकारे वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2026 | 01:27 PM
Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

Follow Us
Follow Us:

एपीएमसी प्रशासनाने दाणा व मार्केटमधील तब्बल १२०० ते १५०० व्यापाऱ्यांना गेल्या अडीच वर्षांच्या थकीत १ टक्का सेवा शुल्काची वसुली करण्यासाठी नोटिसा बजावल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अशा प्रकारे वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत समितीचा अंतिम अहवाल सादर होईपर्यंत सेवा शुल्काची वसुली स्थगित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mumbai News: उड्डाणपुलासाठी १०८ कोटींचे भरीव बळ! मुलुंड पूर्व ते द्रुतगती महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिकेचा निर्णय

बैठकीदरम्यान व्यापारी संघटनांनी जीएसटीसह इतर करांचा भार आधीच व्यापाऱ्यांवर असल्याचे नमूद करत एपीएमसी सेस व युजर चार्जेस पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली होती. त्याऐवजी व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष वापरात असलेल्या जागेच्या आधारे वाजवी शुल्क आकारण्यात यावे, जेणेकरून एपीएमसीचा दैनंदिन देखभाल व प्रशासकीय खर्च भागविता येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला पणन मंत्री रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी आणि सरकार या दोघांच्याही हिताचे संरक्षण करणारे सूत्र सरकार तयार करेल, असे आश्वासन दिले होते.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) चे राष्ट्रीय मंत्री शंकर ठक्कर यांनी सांगितले की, प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि राज्याच्या पणन मंत्र्यांनी वसुलीला स्थगिती देण्याचे निर्देश दिले असतानाही सेवा शुल्काच्या नोटिसा बजावणे हे न्यायालयीन प्रक्रियेचा व मंत्र्यांच्या निर्देशांचा अवमान करणारे आहे. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत एपीएमसी प्रशासनाने सेवा शुल्काच्या वसुलीसाठी जारी केलेल्या सर्व नोटिसा मागे न घेतल्यास सर्व एपीएमसी बाजार समित्यांमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा ठक्कर यांनी दिला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Navi mumbai news major stir in mumbai apmc circles recovery notices issued to 1500 traders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
1

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत
2

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी
3

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय
4

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.