पनवेल/ दिपक घरत : राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कळंबोली वसाहतीत आंदोलन करण्यात आले.या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात व मराठी भाषेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाचा हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा देखील या वेळी मनसैनिकांनी दिला.महाराष्ट्रात राहूनही हिंदी भाषेची सक्ती का ? असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला.
राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी शिकवण्यासंदर्भातील सुधारित आदेश जारी करताना, हिंदी ही तिसरी भाषा म्हणून “सर्वसाधारणपणे” शिकवली जाईल, असा निर्णय घेतला आहे. मात्र, या आदेशानुसार हिंदी सोडून कोणतीही भाषा शिवण्यासाठी किमान 20विद्यार्थी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. हा आदेश मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. त्यानंतर लगेचच 18 जूनपासून मनसेने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाला सुरूवात केली. हा निर्णय अप्रत्यक्षरित्या हिंदीची सक्ती आहे, अशी टिका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.या आंदोलनात शाळकरी विद्यार्थी देखील सहभागी होते. हातात पोस्टर घेत या शाळेतल्या मुलांनी देखील तीव्र विरोध करत आंदोलन छेडलं आहे. “शाळेत ज्ञान वाढूद्यात, हिंदी सक्ती नकोच…, हिंदी सक्तीच्या सावटाखाली मराठी , पुढचा जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईन ” अशी घोषवाक्य लिहिण्यात आली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दर्शवलेल्या विरोधामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या पूर्वी सर्वच शाळांना भेटी देऊन विध्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती केली जाऊ नये या करता राज ठाकरे यांनी दिलेले पत्र शाळा व्यवस्थापकांना दिले आहे.कळंबोली वसाहतीत करण्यात आलेल्या या आंदोलनात या आंदोलनात मनसे महाराष्ट्र कामगार सेना सरचिटणीस अक्षय सुतार,मनसे पनवेल महानगर महिला शहराध्यक्ष स्वरूपा सुर्वे,कळंबोली महिला शहरध्यक्ष वैशाली बोराडे,विभाग अध्यक्ष उद्धव कदम,विभाग अध्यक्ष रामा सावंत, विभाग अध्यक्ष विवेक बोराडे उपविभाग अध्यक्ष विक्रम बावडेकर,उप विभाग अध्यक्ष आबाजी जावीर शहराध्यक्ष मनसे वाहतूक सेना गिरीश तिवारी, विभाग सचिव अभिजीत धुमाळ,विभाग सचिव साहेबराव बोडके शाखा अध्यक्ष चंद्रकांत येरकर,शाखा अध्यक्ष दिनेश गुरव,आसिफ शेख , कुणाल शेडगे, नयन पाटील महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.