Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर…; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन

सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. सर्वांनी एकदिलाने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 15, 2025 | 06:11 PM
जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर...; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन

जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर...; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीची स्वबळावर लढण्याची तयारी
  • इचलकरंजीतील मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफांची भूमिका
  • कार्यकर्त्यांना केले महत्वाचे आवाहन
इचलकरंजी : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. महानगरपालिका निवडणूकीतील जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा. जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. सर्वांनी एकदिलाने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील मेळाव्यात बोलताना केले.

महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा झाला. प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यासाठी आम्हाला मुश्रीफ यांनी हिमालयाची ताकद द्यावी, असे आवाहन केले.

कामगारांना १० हजारात घरकुल

मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजी कामगारांचे शहर असून, त्यांच्या श्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शहराला भेडसावणारा पाणी प्रश्‍न संपविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कागलच्या धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांना १० हजारात स्वप्नातील घरकुल देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. तर लाडक्या बहिणींचे १५०० रुपयाचे असलेले अनुदान २१०० करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पक्षाची ताकद कमी झाली हा भ्रम

यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने घवघवीत यश संपादन करतानाच माजी आमदार अशोक जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याची किमयाही केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही यश निश्‍चित मिळेल. काहीजण पक्षातून गेले म्हणून पक्षाची ताकद कमी झाली, अशा भ्रमात असतील तर ते चुकीचे ठरेल.

Web Title: Ncp leader hasan mushrif has given important advice to the workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Ichalkaranji
  • Ncp Mla

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.