Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससूनमध्ये पोलिसांना मारहाणीमुळे सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल; ‘मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे?’

पुणे शहरातील ससून रुग्णालयातील आयोजित कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या पोलीसांना केलेल्या मारहाणीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मत व्यक्त केले. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाईचे आवाहन केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 07, 2024 | 12:57 PM
ससूनमध्ये पोलिसांना मारहाणीमुळे सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल; ‘मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे?’
Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  पुणे शहरातील ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) आयोजित कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांच्या वर्तणुकीचा सर्वत्र निषेध केला जातो आहे. आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मत व्यक्त केले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन केले आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असलेल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार कांबळे यांनी केलेल्या दादागिरीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पुणेकरांना त्यांच्या संस्कृतीचा, भाषेचा तसेच सगळ्या गोष्टींचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती व ओळख असते. ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका बेजबाबदार व्यक्तीलाही शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसांसह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारणं देखील चुकीचं आहे. राज्यातल्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे” असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

तसेच खासदार सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणाबद्दल आवाहन केले. त्या म्हणाल्या, “पुण्यात जी घटना घडली त्यांचा मी निषेध करते. भाजपसोबत आमचे मतभेद आहेत. मनभेद नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी समोर येऊन बोलायला हवं होतं की माझ्या पोलिसांवर कोणी हात उचलला तरी मी सहन करणार नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, “मिर्जापुर आणि पुण्यात काय फरक आहे, या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहिणार आहे. तुम्ही जर कारवाई करणार नसाल तर कसं चालेल. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेता तर तुमच्या पक्षाला अगोदर ती संस्कृती शिकवा. आपण अशा घटना का सहन करायच्या” असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Ncp mp supriya sule on police slap bjp mla sunil kamble devendra fadnavis nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 12:57 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • MP Supriya Sule
  • Nationalist Congress Party
  • Sassoon Hospital
  • supriya sule

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
4

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.