Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार : महेश तपासे

शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी कधीच विसरणार नाही हे सांगतानाच आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार असल्याचा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2022 | 03:32 PM
आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार : महेश तपासे
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठा भूकंप झाला. गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला सत्ता संघर्ष काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासोबत संपला. या काळात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले होते. दरम्यान अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

ते म्हणाले की, शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले हे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, व पदाधिकारी कधीच विसरणार नाही हे सांगतानाच आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार असल्याचा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.

आज शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भेट घेतली. त्यानंतर या भेटीबाबत महेश तपासे यांनी माहिती देताना भाजपला हे उघड आव्हान दिले आहे. भाजपची सत्ता येताच राष्ट्रवादी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करताना पहायला मिळेल असा विश्वासही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत असल्याने त्यांनी आज पवार यांची भेट घेतली. या भेटीत पवार यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि येत्या काळात कशा पद्धतीने भाजप विरोधात लढा द्यायचा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारला पवारांनी योग्य मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीचे वाटप समान करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली असेही महेश तपासे म्हणाले.

[read_also content=”“आमचे बॉस देवेंद्र साहेब.. ” ; ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना निलेश राणेंच्या शुभेच्छा https://www.navarashtra.com/maharashtra/our-boss-devendra-saheb-congratulations-to-devendra-fadnavis-tweet-by-nilesh-rane-nrab-298962.html”]

दरम्यान शिवसेनेत जी बंडाळी झाली त्याला खतपाणी भाजपने घातले हे सर्व महाराष्ट्र पहात आहे. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली असून येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधात मविआचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी बांधला असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ncp will face bjp as a challenge from today mahesh tapase nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2022 | 03:32 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • devendra fadanvis
  • Mahesh Tapase
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.