Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड-पाटणच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज; 28 जवानांचे विशेष पथक कराडात दाखल

पुढील तीन महिने कराड व पाटण उपविभागात एनडीआरएफचे पथक कार्यरत राहणार असून, पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचावकार्य तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी पथकाकडे राहणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 07, 2026 | 11:32 AM
कराड-पाटणच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज; 28 जवानांचे विशेष पथक कराडात दाखल

कराड-पाटणच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज; 28 जवानांचे विशेष पथक कराडात दाखल

Follow Us
Follow Us:

कराड : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कराड आणि पाटण तालुक्यांतील संभाव्य पूरस्थिती, तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)चे २८ जवानांचे विशेष पथक सोमवारी कराडमध्ये दाखल झाले. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत हे पथक कराड-पाटण उपविभागात तैनात राहून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य करणार आहे.

कराड आणि पाटण तालुक्यांमध्ये पावसाळ्यात नद्यांना पूर येणे, दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटनांची शक्यता कायम असते. यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारीला प्राधान्य दिले असून, त्याचाच एक भाग म्हणून एनडीआरएफचे पथक कराडमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कराडमध्ये आगमन झाल्यानंतर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांनी पथकाचे स्वागत केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, कराड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह आरोग्य, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Rain Alert : पावसाचा धुमाकूळ सुरूच; मुंबईला ऑरेंज, नाशिक-पुण्याला रेड अलर्ट, अनेक शाळांना सुट्टी

यावेळी बोलताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, इन्स्पेक्टर दिलीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफच्या पथकाने कराड तालुक्यातील तांबवे, प्रीतिसंगम घाट आणि रेठरे बुद्रुक येथे मॉकड्रिल घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीची चाचणी पूर्ण केली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करण्यासाठी हे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

पुढील तीन महिने कराड व पाटण उपविभागात एनडीआरएफचे पथक कार्यरत राहणार असून, पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचावकार्य तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी पथकाकडे राहणार आहे.

विशेष पथकात कोणाचा समावेश?

या विशेष पथकात इन्स्पेक्टर दिलीप कुमार, इन्स्पेक्टर अंकित कुमार यांच्यासह प्रदीप माळी, शरद पवार, चरणदास मांडवे, केशव पाचपुते, राहुल घोडके, तुलसीदास वारुडे, राहुल जगदाळे, संतोष जाधव, महेंद्र आसने, सचिन जाडकर, बालाजी रणदिवे, तुषार भोसले, गोकुळ वाघ, गजानन पाथरीकर, सत्यवान इंदलकर, पिराजी माने, टिकट मोहन्तो, खंडू कांबळे, टिंकू कुमार, अरविंद गोपे, दिलीप गोरले यांच्यासह महिला रेस्क्युअर देविका मोरे आणि मंगल जाधव यांचा समावेश आहे.

Web Title: Ndrf ready for disaster management in karad patan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
1

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
2

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
3

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.