ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचा पुतळा ठाण्यात नेपाळी समुदायाने (Nepali Community) जाळला आहे. काल सायंकाळी वागळे इस्टेट येथील इंदिरानगर नाक्यावर घोषणाबाजी करीत नेपाळी बांधवांनी अरविंद सावंत मुर्दाबादच्या घोषणा देत प्रतिकात्मक पुतळा जाळला (Effigy Burn).
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Sinde) यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का देत बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे विश्वासू सेवक चंपासिंह थापा यांना आपल्या बाजूने वळवले. त्यामुळे अरविंद सावंत यांनी, थापा यांचा ‘मातोश्री’चे कुत्रे फिरवणारी व्यक्ती असा उल्लेख केला होता.
अरविंद सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेपाळी समाजात रोष निर्माण झाला आहे. इंदिरानगर नाक्यावर सावंत यांच्या पुतळ्याला चप्पलने मारहाण करून दहन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे असलेले चंपासिंग थापा यांची तुलना नोकराशी करून खासदार सावंत यांनी स्वतःची वैयक्तिक स्थिती दाखवून दिली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नेपाळी समाजाचे महेंद्र सोडारी, कृष्णसिंग सोडारी, चंदनसिंग यांच्यासह अनेक नेपाळी बांधव उपस्थित होते.