Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

नेरुळमधील एल.पी. नाका येथे बिकानेर स्वीट्ससमोरील सर्कलजवळ साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह आल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. महावितरणच्या प्राथमिक अहवालानुसार घटनेची चौकशी सुरू असून दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 06:15 PM
नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट; दोन विद्यार्थिनी जखमी, महावितरणचा प्राथमिक अहवाल समोर

Follow Us
Follow Us:
  • नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात करंट
  • दोन विद्यार्थिनी जखमी
  • महावितरणचा प्राथमिक अहवाल
 

सावन वैश्य | नवी मुंबई : नेरुळ एल.पी. नाका येथील बिकानेर स्वीट्ससमोरील सर्कलजवळ पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघींना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नेरुळ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे एल.पी. नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचवेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तेथून पायी जात असलेल्या कु. उज्वला लक्ष्मण वाघ आणि कु. शुभांगी सुभाष वालखंडे या दोन विद्यार्थिनींना जोरदार विद्युत धक्का बसला. दोघीही खाली कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्यांना रिक्षाच्या सहाय्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, या घटनेबाबत महावितरणच्या भांडुप परिमंडलाच्या जनसंपर्क विभागाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, नेरुळ एल.पी. नाका पुलाखालील नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथदिवा वीजजोडणीवरून परिसरातील पथदिव्यांना वीजपुरवठा केला जातो. घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता, संबंधित वीजजोडणीच्या मीटरमधून जाणाऱ्या आउटगोइंग केबलपैकी एका केबलचे इन्सुलेशन तुटलेले असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. पावसाच्या पाण्याशी या केबलचा संपर्क आल्यामुळे परिसर विद्युतभारित झाला असावा, अशी शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे. या घटनेनंतर सहाय्यक विद्युत निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच महावितरणने तात्काळ संबंधित वीजपुरवठा बंद करून परिसर सुरक्षित केला.

महावितरणने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, संबंधित पथदिवा वीजजोडणी आणि त्यावरील आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची असून तिची देखभालही महापालिकेमार्फत केली जाते. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तांत्रिक तपासणी व आवश्यक कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येणार आहे.

या घटनेनंतर पावसाळ्यापूर्वी पथदिव्यांच्या वीजजोडण्या, केबल्स आणि जलनिस्सारण व्यवस्थेची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महानगरपालिका, महावितरण आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Mumbai Rain: अखेर मुंबईकरांना दिलासा! ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुंईबत पावसाचे आगमन

Web Title: Nerul water electrocution two school girls injured lp naka bikaner sweets circle mahavitaran report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Rain Update

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव
1

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
3

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.