Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : आता नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार सेवेत; लांबचा प्रवास होणार सुकर

बाबा पेट्रोल पंप तसेच सिडको येथून ही बस थेट गोवा, बंगळूरु, हैदराबाद अशा तीन शहरात सोडण्याचे नियोजन केले जात आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा असलेली ही बस 450 किलो व्हॅट क्षमतेच्या एचव्ही बॅटरीसह सुसज्ज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2025 | 01:41 PM
लांबच्या प्रवासासाठी आता नवीन इलेक्ट्रॉनिक बस

लांबच्या प्रवासासाठी आता नवीन इलेक्ट्रॉनिक बस

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : लांबचा प्रवास करण्यासाठी न्यूगो या कंपनीने देशातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक एसी स्लीपर बस सेवा सुरू केली आहे. ही सेवा आता छत्रपती संभाजीनगर येथूनही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या दिल्ली-अमृतसर, बेंगळुरू-चेन्नई, हैदराबाद-राजमुंद्री, चेन्नई-मदुराई, विजयवाडा-5 विशाखापट्टणम आणि बेंगळुरू-मदुराई यासारख्या प्रमुख मार्गावर ती सुरू आहे.

बाबा पेट्रोल पंप तसेच सिडको येथून ही बस थेट गोवा, बंगळूरु, हैदराबाद अशा तीन शहरात सोडण्याचे नियोजन केले जात आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा असलेली ही बस 450 किलो व्हॅट क्षमतेच्या एचव्ही बॅटरीसह सुसज्ज आहे. त्यामुळे ती एका चार्जमध्ये सुमारे 350 किलोमीटर प्रवास करू शकते. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे या बसची रेंज वाढवून 600 किलोमीटरपर्यंत करता येते. या बसमध्ये स्पीड लॉक (८० किमी प्रतितास), मोनोकॉक चेसिस, एबीएस ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

‘न्यूगो’च्या या नव्या बसमध्ये स्लीपर बर्थ हे अधिक आरामदायक आणि एर्गोनॉमिक डिझाईनसह सुसज्ज आहे. प्रवाशांसाठी सॉफ्ट टच इंटिरिअर, एम्बियंट एलईडी लाइटिंग, यूएसबी चार्जिंग पोर्ट, नाईट रीडिंग लॅम्प आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहे देखील उपलब्ध आहेत. यासह महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 24×7 हेल्पलाइन, पिंक सीट फीचर, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, जीपीएस ट्रॅकिंग आणि ड्रायव्हर ब्रेथ ऍनालायझर टेस्ट यांसारख्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, न्यू गोच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक आहेत. यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन, पिंक सीट फीचर, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, जीपीएस ट्रॅकिंग आणि ड्रायव्हर ब्रेथ ऍनालायझर टेस्ट यांसारख्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. न्यूगोच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे. यासह देशाच्या हरित भविष्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल. इतकेच नव्हे तर प्रवाशांना देखील एका वेगळ्या पद्धतीने प्रवासाचा आनंद लुटता येईल.

Web Title: New electric buses will now come into services in sambhajinagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Electric Buses

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : ‘शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क नक्की बजावा’ : इम्तियाज जलील
1

Chhatrapati Sambhajinagar : ‘शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क नक्की बजावा’ : इम्तियाज जलील

Electric Vehicle Market in India: भारताच्या ईव्ही क्रांतीला वेग! २०२५ मध्ये पीएलआय आणि पीएम ई-ड्राइव्हचा मोठा प्रभाव
2

Electric Vehicle Market in India: भारताच्या ईव्ही क्रांतीला वेग! २०२५ मध्ये पीएलआय आणि पीएम ई-ड्राइव्हचा मोठा प्रभाव

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर-टँकर चोरणारी टोळी अटकेत; ३.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्ये Toyota Kirloskar Motor चा सहभाग; दळवी म्‍हणाले, “सरकारचे…”
4

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्ये Toyota Kirloskar Motor चा सहभाग; दळवी म्‍हणाले, “सरकारचे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.