new grand building of Rs 109 crore will be built for the Vadgaon Maval Court
वडगाव मावळ : प्रतिनिधी : मावळ तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपान कोरणारा महत्वाचा टप्पा वडगाव मावळ येथे नोंदवला गेला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील व बार असोसिएशन यांची संयुक्त बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांच्या न्यायप्रवेशासाठी दीर्घकाळापासूनची उणीव भासत असलेल्या भव्य न्यायालयीन वास्तू उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाच्या जागेवर उभारण्यात येणारी ही इमारत पुढील ५० वर्षांचा विचार करून आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह बांधली जाणार आहे.
या भव्य इमारतीमुळे वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना त्वरित, सुलभ व पारदर्शक न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्बल घटकांनाही न्याय मिळविण्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायालयीन कामकाजात कार्यक्षमता वाढविणे, वकिलांना योग्य सुविधा उपलब्ध करणे आणि सर्वसामान्यांना न्यायालयीन वातावरणात सहज प्रवेश मिळावा हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस न्यायमूर्ती डी. के. अनभुले यांच्यासह अनेक ज्येष्ठ वकील व वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रताप शेलार, लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. रंजना भोसले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक न्यायप्रणाली सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. न्यायालयीन इमारतीच्या उभारणीचा निर्णय हा आमदारांच्या दूरदृष्टीचा व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा पुरावा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक निधी, सुविधा व नियोजन योग्य पद्धतीने पार पडेल, अशी खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली. या निमित्ताने वडगाव मावळ न्यायालयाला भविष्यातील न्यायनगरी बनविण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या बैठकीत घेतलेला निर्णय मावळ तालुक्याच्या न्यायनगरीसाठीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ऐतिहासिक व दूरगामी परिणाम घडवणारा ठरणार आहे. न्यायाच्या दारी प्रत्येक नागरिक सहज पोहोचेल, अशी नवी दृष्टी या उपक्रमातून साकार होणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू
सहाव्या मजल्यावर गॅलरी मध्ये कपडे वाळत घालत असताना तोल जाऊन खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (4 सप्टेंबर) मनोहर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली. रेवती ठाकरे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर नगर येथील विद्या विहार कॉलनी मधील द रियानो वेलन्सिया सोसायटी मध्ये रेवती यांचे कुटुंब सहाव्या मजल्यावर राहते. गुरुवारी सकाळी त्या घराच्या गॅलरी मध्ये स्टूलवर उभा राहून कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रेवती यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.