
१२ वर्षांखालील गटात विद्या व्हॅली-बिशप्स कॅम्प अंतिम सामना
लॉयला स्कूल आणि एक्स-लॉयला अल्युमनी नेटवर्क (ELAN) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला टाटा ऑटोकॉमचे प्रायोजकत्व लाभले आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात लॉयला हायस्कूलने दोन्ही सत्रांत प्रत्येकी एक गोल नोंदवत विद्या भवन हायस्कूलवर २-० असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात युग चौहानने अखेरच्या टप्प्यात केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर जे. एन. पेटिट टेक्निकल स्कूलने बिशप्स को-एड स्कूल, उंड्री संघाचा १-० असा निसटता पराभव केला.
Loyola Football Cup 2026 मध्ये गोल्सचा धडाका अन्…; ‘या’ चार संघांचा दणदणीत विजय
लॉयलाकडून मल्हार चव्हाणने आठव्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आरव अहिवळेने ४३व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत यजमानांचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
दुसरी उपांत्य लढत अत्यंत चुरशीची झाली. जे. एन. पेटिट आणि बिशप्स को-एड उंड्री यांच्यातील सामना बराच काळ गोलशून्य बरोबरीत होता. मात्र, ५७व्या मिनिटाला युग चौहानने केलेला गोल निर्णायक ठरला.लॉयला संघाने यापूर्वीच १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्या गटात त्यांची सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलशी लढत होणार आहे. त्यामुळे लॉयलाला दुहेरी विजेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या १२ वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीत एकांश ओझाच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर विद्या व्हॅलीने बिशप्स को-एड स्कूल, उंड्री संघाचा ५-१ असा धुव्वा उडवला. ओझाने सातव्या, २०व्या आणि २४व्या मिनिटाला गोल केले. अहान बैस आणि रियान जेधे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात एहान पठाणच्या दोन गोलच्या जोरावर द बिशप्स स्कूल, कॅम्प संघाने लॉयला हायस्कूलवर ३-० असा विजय मिळवला. प्रणव मेननने आठव्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. त्यानंतर पठाणने २०व्या आणि ३१व्या मिनिटाला गोल केले.१४ वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीत आरव इंगळे आणि शॉन अंगारे यांनी प्रत्येकी दोन गोल करत लॉयलाला बिशप्स को-एड उंड्रीविरुद्ध ४-२ असा विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात रेयान पंजाबीच्या दोन गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलने विद्या व्हॅलीवर २-१ अशी मात केली.