Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. अमोल बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नगरसेवकांनी या मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2026 | 04:26 PM
खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Follow Us
Follow Us:
  • खडकवासला धरणात दूषित सांडपाणी 
  • अमोल बालवडकरांकडून महापौरांना वॉटर प्युरिफायर भेट
  • पुणेकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी उपाययोजनांची मागणी
पुणे : खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापौर आणि महापालिका आयुक्त यांना वॉटर प्युरिफायर भेट दिला. विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली अमोल बालवडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नगरसेवकांनी या मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारीमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

दूषित पाण्याचा स्रोत शोधण्याची मागणी

खडकवासला धरणात दूषित सांडपाणी नेमके कुठून मिसळत आहे, याचा तातडीने शोध घेऊन तो स्रोत बंद करावा, अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळत असल्याची खात्री द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरा! १० टक्के पाणीकपातीला सुरुवात; अपव्यय केल्यास…; आयुक्तांनी दिला इशारा

‘पुणेकरांना आश्वासने नकोत, शुद्ध पाणी हवे’

अमोल बालवडकर म्हणाले की, पुणेकरांना केवळ आश्वासने नकोत, तर शुद्ध पिण्याचे पाणी हवे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर मुद्द्यावर प्रशासन केवळ आश्वासने देऊन आपल्या जबाबदारीपासून मागे हटू शकत नाही. त्यांनी तात्काळ ठोस पावले उचलावीत. शुद्ध पिण्याचे पाणी हा नागरिकांचा अधिकार आहे आणि त्यासाठी आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: खडकवासला धरणाबाबत कोणता मुद्दा उपस्थित करण्यात आला?

    Ans: खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा मुद्दा पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला.

  • Que: अमोल बालवडकर यांनी महापौर आणि आयुक्तांना काय भेट दिले?

    Ans: पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी अमोल बालवडकर यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट दिला.

  • Que: नगरसेवकांनी प्रशासनाकडे कोणती मागणी केली?

    Ans: पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी दूषित सांडपाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Amol balwadkar took an aggressive stance at the municipal corporation over the issue of contaminated sewage water nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • NCP News
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
1

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
2

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
3

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के
4

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.