Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News : ‘सॉरी, अहिल्यानगर…’! निर्मला सीतारामन यांनी व्यासपीठावरून मागितली अहिल्यानगरकरांची माफी; नेमकं काय घडलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान चुकून ‘अहमदनगर’ असा उल्लेख केला. मात्र, शहराच्या नामांतराची आठवण होताच त्यांनी तत्काळ स्वतःला दुरुस्त करत “सॉरी, अहिल्यानगर...” असे म्हणत जाहीर माफी मागितली. या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 25, 2026 | 02:50 PM
‘सॉरी, अहिल्यानगर...’! निर्मला सीतारामन यांनी व्यासपीठावरून मागितली अहिल्यानगरकरांची माफी; नेमकं काय घडलं?

‘सॉरी, अहिल्यानगर...’! निर्मला सीतारामन यांनी व्यासपीठावरून मागितली अहिल्यानगरकरांची माफी; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

पोपट पिटेकर,अहिल्यानगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणादरम्यान ‘अहमदनगर’ असा उल्लेख केल्यामुळे तत्परतेने स्वतःला दुरुस्त करत व्यासपीठावरून जाहीर माफी मागितली. “सॉरी, अहिल्यानगर…” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची आणि विशेषतः अहिल्यानगरकरांची दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या या संवेदनशीलतेची आणि तत्परतेची सध्या राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. एका अधिकृत कार्यक्रमात महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांविषयी (MSMEs) बोलताना हा प्रसंग घडला.

काय घडलं नेमकं?

महाराष्ट्रातील औद्योगिक शहरांचा उल्लेख करताना अर्थमंत्री म्हणाल्या, “पुणे, नागपूर आणि अहमदनगर…” मात्र, ‘अहमदनगर’ हा शब्द उच्चारताच त्यांना शहराच्या झालेल्या ऐतिहासिक नामांतराची त्वरित आठवण झाली. त्यांनी लगेचच आपले भाषण थांबवले आणि म्हणाल्या, “अहमदनगर… मला वाटतं या शहराचं नाव आता बदललं आहे. मी अहमदनगर म्हणतेय, याला ‘नगर’ही म्हणतात, पण आता याला दुसरं नाव मिळालं आहे.” त्यानंतर त्यांनी समोर बसलेल्या उपस्थितांकडे पाहत, “महाराष्ट्रातून आलेल्या बंधू-भगिनींनो, मला माफ करा… ‘अहिल्यानगर’, सॉरी!” अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली.

MLC Election 2026 : ५ लाखांचे टोकन अन् ‘लक्ष्मीदर्शन’; चंद्रपूर-गडचिरोलीचे काँग्रेस नगरसेवक कुठे गायब झाले?

नामांतराचा आदर आणि कौतुक

अर्थमंत्र्यांनी चूक लक्षात येताच केवळ स्वतःला सुधारले नाही, तर पुढील संपूर्ण भाषणात ‘अहिल्यानगर’ या नवीन नावाचाच अत्यंत आदराने उल्लेख केला. “पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर मधील संरक्षण क्षेत्रातील MSMEs ना सरकारकडून विशेष आर्थिक बळ आणि तंत्रज्ञानासाठी मदत दिली जाईल,” असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. देशाच्या अर्थमंत्र्यांनी एका मोठ्या व्यासपीठावरून स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर करत तत्परतेने माफी मागितल्यामुळे, अहिल्यानगरमध्ये त्यांच्या या कृतीचे मोठे कौतुक केले जात आहे.

या उद्योगांना मिळणार विशेष आर्थिक सवलती

अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर या भागांतील संरक्षण क्षेत्राशी निगडित MSMEs च्या गरजा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढील सुविधा पुरवण्यावर सरकारचा भर असेल ऑर्डर सायकल फायनान्सिंग: उत्पादनाच्या ऑर्डरनुसार आवश्यक असणारा निधी पुरवणे.

तंत्रज्ञान अपग्रेडेशन कर्ज: उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विशेष कर्ज उपलब्ध करून देणे.
वर्किंग कॅपिटल : संरक्षण क्षेत्रातील खरेदी प्रक्रियेला लागणारा मोठा कालावधी लक्षात घेऊन, त्यानुसार लवचिक खेळते भांडवल उपलब्ध करून देणे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विशेषतः अहिल्यानगर आणि परिसरातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित लघू उद्योजकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

Web Title: Nirmala sitharaman apologises after calling ahilyanagar ahmednagar during speech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Maharashtra Political
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

Ahilyanagar :  हक्काच्या शेतरस्त्यासाठी लढा, आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन
1

Ahilyanagar : हक्काच्या शेतरस्त्यासाठी लढा, आंदोलनानंतर प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.