Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule: ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’, अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या…

दिल्लीतील जंतरमंतर येथे उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अत्यंत भावूक आणि तितकीच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. "माझा भाऊ आता आपल्यात नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या नावाने सुरू असलेल्या सर्व चर्चा आता कायमच्या थांबल्या पाहिजेत," अशा स्पष्ट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपली खंत व्यक्त केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 05:47 PM
अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या... (Photo Credit- X)

अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या... (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’
  • अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक
  • म्हणाल्या…
नवी दिल्ली: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एकत्रीकरणाबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, अशी कबुली खासदार सुनील तटकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तटकरेंच्या या जाहीर कबुलीवर, दिल्लीतील जंतरमंतर येथे उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अत्यंत भावूक आणि तितकीच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “माझा भाऊ आता आपल्यात नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या नावाने सुरू असलेल्या सर्व चर्चा आता कायमच्या थांबल्या पाहिजेत,” अशा स्पष्ट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपली खंत व्यक्त केली.

‘माझा भाऊ जाऊन ५ महिने झाले, कुटुंब अजूनही…’ – सुप्रिया सुळे

अजित पवार यांच्या निधनाची आठवण काढताना सुप्रिया सुळे यांचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, “माझ्या भावाला जाऊन आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब या मोठ्या दुःखातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे आणि ताकदीने काम करावे, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून आणि पूर्ण ताकदीने तयार होतो.”

लाईव्ह |📍दिल्ली ⏭️ 17-07-2026 पत्रकारांशी संवाद
https://t.co/gRn273pR4H
— Supriya Sule (@supriya_sule) July 17, 2026

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

विरोधी गटाच्या भूमिकेमुळे प्रचंड वेदना आणि दुःख झाले

सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले की, “ज्या दिवशी दादांचे निधन झाले, त्याच दिवशी आमच्या बाजूने ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रीकरणाचा मुद्दा पुढे आणला होता. परंतु, समोरच्या पक्षाने ते नाकारले. ‘अशी कोणतीही बैठक किंवा घटना कधी घडलीच नव्हती,’ असे त्यांनी सांगितले. एका बाजूला आम्ही आमचा सख्खा भाऊ गमावल्याच्या दुःखात होतो, तर दुसऱ्या बाजूला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत होतो. अशा वेळी त्यांच्या नकारघंटेने आम्हाला खूप वेदना दिल्या.”

‘आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, विषय आता कायमचा संपला’

सुनील तटकरेंच्या आजच्या विधानानंतर सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर पूर्णविराम लावला. त्या म्हणाल्या, ‘आम्ही अत्यंत स्वाभिमानी लोक आहोत. आमच्या स्वाभिमानाशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. ज्या दिवशी दादा गेले आणि त्यानंतर समोरच्या नेत्यांची जी विधाने मी पाहिली, त्यावरूनच मला स्पष्ट झाले की दादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. म्हणूनच आम्ही तो विषय त्याच क्षणी कायमचा संपवला आहे. आता आमचे संपूर्ण लक्ष केवळ महाराष्ट्र आणि देशातील जनतेची प्रामाणिक सेवा करण्यावर केंद्रित आहे.”

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका

Web Title: What dada wanted didnt happen supriya sule gets emotional while recalling ajit pawar she said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • ajit pawar
  • delhi
  • Maharashtra Political
  • Nationalist Congress Party
  • supriya sule

संबंधित बातम्या

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?
1

FSSAI Big Decision Delhi : दिल्लीतील हॉटेल-रेस्टॉरंट्सवर छापे पडणार नाहीत! FSSAI ची मोठी घोषणा, पण काय घेतला निर्णय?

Supriya Sule Emotional Post for Ajit Pawar: तू अचानक येशील अन् ..;सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट
2

Supriya Sule Emotional Post for Ajit Pawar: तू अचानक येशील अन् ..;सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?
3

सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरून काँग्रेस-शरद पवार गट आमने-सामने; वडेट्टीवारांच्या माफीनंतर वादावर पडदा?

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’
4

सुप्रिया सुळेंबाबतचं ‘ते’ वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी घेतलं मागे; म्हणाले, ‘अनावधानाने उल्लेख झाला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.