Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी नवी तारीख जाहीर; कृषीमंत्र्यांनी सांगितले विलंबाचे कारण

राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन लाख रुपयांच्या पीक कर्जाची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 12:54 PM
कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले 'हे' आवाहन

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले 'हे' आवाहन

Follow Us
Follow Us:

राज्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा
केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. विशेष म्हणजे, यापुर्वी कर्जमाफीच्या लाभ घेतलेल्या काही पात्र
शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरुवातीला जूनअखेरपर्यंत कर्जमाफी लागू होईल, अशी चर्चा होती. त्यानंतर जुलैच्या पाहिल्या आठवड्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र विविध प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय पुन्हा पुढे ढकलला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असून सरकारकडून स्पष्ट तारीख जाहीर होण्याची मागणी होत आहे.

दरम्यान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणणण्यानुसार, जुलै महिना संपण्यापुर्वी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली असून, काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफी उशिरा होण्यामागे काही तांत्रिक अडचणी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विशेषतः आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची
माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच अंतिम यादी तयार होणार आहे. सरकारच्या नव्या
धोरणानुसार आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि लहान शेतकऱ्यांनाच
प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.

पुन्हा मोठी कारवाई होणार ! तुकाराम मुंढेंनी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिला ‘हा’ इशारा

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही या विषयावर सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या मते, पात्र लाभार्थी निश्चित
करण्यासाठी सरकारला जास्त वेळ लागत आहे. यापूर्वीही विविध योजनांमध्ये लाभार्थ्यांची माहिती तपासण्यासाठी अनेक महिने
लागले होते. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेलाही विलंब होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

रोहित पवारांनी सरकारला इशाराही दिला आहे. ऑगस्टपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या
प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सरकार पुढील काही दिवसांत कोणता
निर्णय घेते, याकडे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी शेतकरी केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवून वाट पाहत आहेत. सरकारने दिलेल्या नव्या मुदतीनुसार जुलैअखेरीस कर्जमाफीचा मार्ग मोकळा होतो का, की पुन्हा एकदा निर्णय पुढे ढकलला जातो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Maharashtra IMD Alert: विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय? मुंबईसह ‘या’ ९ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Web Title: Agriculture minister dattatray bharne stated that the date for the farm loan waiver is in the first week of july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Farmer Crisis
  • Maharashtra Political

संबंधित बातम्या

Maharashtra Farmers News : ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कठीण काळ’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
1

Maharashtra Farmers News : ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी कठीण काळ’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Buldhana News: पावसाने मारली दडी, सोयाबीनचे दाणेच भरले नाहीत! बुलढाण्यातील शेतकऱ्यांवर संकट
2

Buldhana News: पावसाने मारली दडी, सोयाबीनचे दाणेच भरले नाहीत! बुलढाण्यातील शेतकऱ्यांवर संकट

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
3

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Amravati News: गडचिरोलीत ७३ टक्के अल्पभूधारक शेतकरी! उत्पन्नवाढीत खोडा; सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज
4

Amravati News: गडचिरोलीत ७३ टक्के अल्पभूधारक शेतकरी! उत्पन्नवाढीत खोडा; सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.