Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शंकर जगताप यांना निवडून द्या, मी तुमच्यासाठी…; नितीन गडकरी यांचं मोठं आश्वासन

वाहतुकीच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंचवडकरांना आवाहन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2024 | 01:53 PM
शंकर जगताप यांना निवडून द्या, मी तुमच्यासाठी...; नितीन गडकरी यांचं मोठं आश्वासन

शंकर जगताप यांना निवडून द्या, मी तुमच्यासाठी...; नितीन गडकरी यांचं मोठं आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : निवडणूक काळात जो उमेदवार तुमचं भविष्य बदलू शकतो, नशीब बदलू शकतो, तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो, अशा उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात तर तुमच्या सर्व समस्या नक्कीच मार्गी लागतील. आणि या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेण्याची क्षमता शंकर जगताप यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही जगताप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, त्यांच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न, वाहतुकीच्या समस्या सोडविण्याची गॅरंटी मी देतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंचवडकरांना आवाहन केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा भूमकर चौक, वाकड येथील द्रौपदा लॉन्स मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सभेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, जगातील सर्वात वेगाने शहरीकरण आणि औद्योगिकरण होणारे पिंपरी चिंचवड शहर आहे. या शहरीकरणाचा आणि औद्योगिकरणाचा ताण मूलभूत सोयी सुविधांवर पडतो. त्याचाच परिणाम म्हणजे शहरातील वाढती वाहतूक कोंडीची समस्या ही आहे. मात्र या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आपण पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहरात एलिव्हेटेड रस्ते निर्मितीवर भर दिला आहे.

त्यामाध्यमातून आपण रावेत ते हडपसर या मार्गावर 5 हजार कोटी रुपयांच्या कामाचा डीपीआर तयार केला आहे. त्याचबरोबर रावेत ते नऱ्हे मार्गावर 4 हजार कोटी रुपयांचा डीपीआर, रावेत ते कात्रजपर्यंत 5 हजार कोटी रुपयांचा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी 7 हजार कोटी रुपयांची तरतूद आपण एलिव्हेटेड रस्त्यांसाठी केलेली आहे. या रस्त्यांमुळे पिंपरी चिंचवड शहरावर पडणारा वाहतुकीचा भार कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी काळात पुणे जिल्ह्यात 1 लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मार्गी लागतील ज्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर वाहतूक कोंडी मुक्त शहर होईल असे आश्वासन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

यावेळी गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार शरद ढमाले, भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, शंकर मांडेकर, माजी नगरसेवक शीतल शिंदे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर , माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, आरपीआय आठवले गटाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल व्हावळकर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, सचिन साठे, विशाल कलाटे, स्नेहा कलाटे, राम वाकडकर यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Nitin gadkari has given a big promise to the people from the meeting in chinchwad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
1

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

जांभूळबेट पर्यटन रखडलेल्या विकासाला गतीची अपेक्षा; झरीकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
2

जांभूळबेट पर्यटन रखडलेल्या विकासाला गतीची अपेक्षा; झरीकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
4

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.