Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : निजामकालीन शेतरस्ता गायब; बनावट नकाशाने रस्ता केला गायब? ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप

मेथा येथील वंशपरंपरागत मेथा-पांगरा तर्फे लाख जाणाय निजामकालीन शेतरस्ता अचानक नकाशातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 03:51 PM
Nizam-era farm road in Metha suddenly disappears from the map, villagers attack

Nizam-era farm road in Metha suddenly disappears from the map, villagers attack

Follow Us
Follow Us:
  • मेथा येथील निजामकालीन शेतरस्ता गायब
  • जुना अधिकृत नकाशा बदलला
  • शेतकरी आणि ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
Maharashtra News : हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा येथील वंशपरंपरागत मेथा-पांगरा तर्फे लाख जाणाय निजामकालीन शेतरस्ता अचानक नकाशातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Hingoli News) हा रस्ता शोधून पुन्हा पूर्ववत करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत ग्रामस्थांनी दिला, या संदर्भात आज २४ फेब्रुवारी रोजी दुपारी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन सादर केले. ग्रामस्थांच्या मते, संबंधित शेतरस्ता निजामकालीन असून जुन्या अधिकृत नकाशावर त्याची स्पष्ट नोंद आहे. सोलार कंपनीला जागा देण्यासाठी बनावट नकाशा तयार करून रस्ता मुद्दाम ‘उडवण्यात’ आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Nanded News)

वंशपरंपरागत रस्त्यासाठी ग्रामस्थ एकवटले, आंदोलनाची चेतावणी
यामुळे शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारी रोजीही ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानंतर तलाठी यांनी पंचनामा केला. मात्र मंडळ अधिकारी पिपळदरी यांच्या नकाशात रस्त्याची नौद जुळत नसल्याचे सांगण्यात आले, आश्चर्याची बाब म्हणजे गुगल मॅपवर स्पष्ट दिसणारा रस्ता अधिकाऱ्यांना पंचनाम्यात दिसला नाही, याचाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अधिका-यांच्या पंचनाम्यावरूनच रस्ता चोरीला गेल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप करत शेतकऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल
करून रस्त्याचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती

सदर रस्ता बंद झाल्याने शेती कामासाठी ये-जा करणे कठीण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवेदनावर दिलीप नागरे, गुलाब लोंढे, ज्ञानेश्वर लोंढे, अमोल लोंढे, भीमराव शिंदे, सदाशिव शिंदे, शेषराव ढोकणे, नारायण शिंदे, आनंद शिंदे, चांदु लोंढे, अनिता आखरे, माधव लोंढे, शिवाजी लोंढे, कुंडलिक लोंढे, उत्तम लोंढे, गणेश लोढे, मुक्ताबाई कुबडे, विश्वनाथ कुरवाडे, अशोक लोढे, गीता लोंढे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे देखील वाचा :  ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

लागवड व्यवस्थापन कार्यशाळा

आँढा नागनाथ येथे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी रोजी हळद व सोयाबीन लागवड व्यवस्थापन विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी नारायण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मारोतराव खांडेकर, नितीन जिंतूरकर व सोपान शिंदे उपस्थित होते. डॉ. अनिल ओळंबे यांनी हळद लागवड, रोगमुक्त बियाणे व पाणी व्यवस्थापन तर डॉ. राजेश भालेराव यांनी सोयाबीनच्या प्रगत वाण, जमिनीची मशागत व खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. भागवत सपकाळ यांनी संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.
उत्पादनवाढ, रोगनियंत्रण व प्रक्रिया उद्योगांवर विशेष भर देण्यात आला. अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी तज्ज्ञांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक पद्धतीत आवश्यक बदल करण्याचे आवाहन यावेळी करण्यता आले.

Web Title: Nizam era farm road in metha suddenly disappears from the map villagers attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Hingoli News
  • nanded news

संबंधित बातम्या

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त
1

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.