Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 हजार झाडांचा मागमूस नाही; पर्यावरण हानीप्रकरणी ठेकेदारांवर कारवाईची मागणी

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव तसेच कर्नाटकातील हुबळी-धारवाड या शहरांमध्ये झाडांची स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 22, 2026 | 01:43 PM
१७ हजार झाडांचा मागमूस नाही;

१७ हजार झाडांचा मागमूस नाही;

Follow Us
Follow Us:

सातारा : शहरी विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि बेपत्ता झालेल्या हजारो झाडांचा पारदर्शक हिशोब जाहीर करावा, अशी मागणी सुराज्य अभियानाने केली आहे. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत अभियानाचे कार्यकर्ते राहुल कोल्हापूरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राहुल कृपा महाडिक आणि सेवानिवृत्त कृषी अधिकारी मुकुंद म्हेत्रे उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या नोंदींनुसार मागील दोन वर्षांत तब्बल १७५३३ झाडांची माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने प्रशासनाच्या पर्यावरणीय धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव तसेच कर्नाटकातील हुबळी-धारवाड या शहरांमध्ये झाडांची स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. झाडांच्या भोवती सिमेंट-काँक्रीट टाकल्यामुळे त्यांच्या मुळांची वाढ खुंटते आणि त्यामुळे झाडांचे आयुष्य धोक्यात येते, असेही त्यांनी सांगितले. वाढत्या तापमानाला मानवनिर्मित हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा आरोपही करण्यात आला.

राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) मार्गदर्शक तत्त्वांनुसार नागरी भागातील प्रत्येक झाडाभोवती किमान एक मीटर मोकळी जागा ठेवणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असून, साताऱ्यात झाडांवर जाहिरातीचे फलक लावून त्यांचे नुकसान केले जात असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.

वृक्षसंपदेचे संवर्धन करण्याचा संकल्प

‘वृक्ष संजीवनी’ मोहिमेद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील वृक्षसंपदेचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण अधिनियम १९७५ अंतर्गत दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांची नावे सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली. यासोबतच ‘डी-काँक्रीट’ मोहीम राबवून झाडांभोवती मोकळी जागा निर्माण करणे, वृक्षारोपणाचे स्वतंत्र तृतीय-पक्षीय परीक्षण करणे आणि त्याचा अहवाल नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर एनजीटी कायदा २०१० च्या कलम २६ अंतर्गत अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला.

Web Title: No trace of 17000 trees demand for action against contractors over environmental damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Environmental Issue
  • Satara News

संबंधित बातम्या

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?
1

Sangli Bank Election : सातारा बँकेच्या निकालाने सांगलीत खळबळ; चार संचालकांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष
2

Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत न्यायालयीन ट्विस्ट! १० उमेदवारांच्या पात्रतेची चर्चा; २१ ऑक्टोबरकडे लक्ष

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक
3

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
4

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.