Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर द्या; अन्यथा उपोषणाचा इशारा, प्रकाश साबळे आक्रमक

Satara News : सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. उत्पादन खर्च आणि शेतीवरील वाढत्या आर्थिक बोजामुळे शेतकरी अडचणीत आहेत. ऊसदर निश्चित होण्यापूर्वीच तोडणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 14, 2026 | 05:23 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पाच हजार रुपये दराची मागणी
  • दर जाहीर होण्यापूर्वीच ऊसतोड सुरू; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
  • जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची बैठक बोलवावी; अन्यथा उपोषण
Satara News : सातारा जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढता उत्पादन खर्च, खतांचे महागलेले दर, मजुरी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे. अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पाच हजार रुपये दराची मागणी

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी यंदा अनेक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दुष्काळी परिस्थिती, खतांचे वाढलेले दर, मजुरी आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी ऊस पिकवण्यासाठी मोठे भांडवल आणि मेहनत खर्च केली आहे. त्यामुळे त्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेने केली आहे.

Bheema Patas Sugar Factory: भीमा पाटसवर साखर वाहतूक पूर्ण ठप्प!; शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा

दर जाहीर होण्यापूर्वीच ऊसतोड सुरू; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

सातारा जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नसतानाही काही ठिकाणी ऊसतोड सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या उसाला नेमका किती दर मिळणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सर्व शेतकरी संघटनांकडून प्रतिटन पाच हजार रुपये दराची मागणी केली जात असली, तरी कारखानदारांकडून अद्याप सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. दर निश्चित होण्यापूर्वीच तोडणी सुरू होणे हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर

जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची बैठक बोलवावी; अन्यथा उपोषण

या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची बैठक बोलावून शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करावी आणि ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे. यावेळी मधुकर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव आणि राहुल पवार उपस्थित होते.

Web Title: Satara news pay 5000 per tonne for sugarcane warning of a hunger strike otherwiseprakash sable takes an aggressive stancecp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास
1

Inspirational Story : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा; सुगमतेच्या माध्यमातून निलेश सिंगित यांचा प्रेरणादायी प्रवास

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
2

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
3

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
4

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.