
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला. मंगळवारी तब्बल ४७ उमेदवारांनी ६४ अर्ज दाखल केले. यामध्ये खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह संग्रामसिंह देशमुख, देवराज पाटील, शैलजा पाटील, पूजा विशाल पाटील, स्वाती सुशांत खाडे, अस्मिता बाळासाहेब होनमोरे, शशिकांत नागे, भालचंद्र पाटील, दिग्विजय सूर्यवंशी आणि रावसाहेब पाटील यांचा समावेश आहे.
मंगळवारअखेर जिल्हा बँकेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असून, गुरुवार दि. १ ऑक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत प्रमुख राजकीय गटांकडून आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
सोसायटी गटात दिग्गजांची गर्दी
सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील, पूजा विशाल पाटील, शैलजा प्रकाशबापू पाटील, भालचंद्र पाटील, देवराज पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, महेश पवार, काकासो काशीद, विनायक मोहिते, तानाजी महिंद आणि शिवाजी पाटील यांनी अर्ज दाखल केले.
महिला गटातून सहा अर्ज
महिला गटातून पूजा विशाल पाटील, छाया खरमाटे, शीतल पवार, स्वाती सुशांत खाडे, अस्मिता बाळासाहेब होनमोरे आणि मंदाताई लालासो करंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अनुसूचित जाती गट
अनुसूचित जाती गटातून अरुण कांबळे, प्रकाश कदम, शशिकांत नागे, मोहन वनखंडे, विलास सर्जे आणि तानाजी सातपुते यांनी अर्ज दाखल केले.
विविध गटांतही अर्जांची संख्या वाढली
विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून गजानन शेंडगे, विष्णू माने, शंकर माने आणि मुकुंद ठोंबरे यांनी अर्ज दाखल केले. प्रक्रिया गटातून अमोल पाटील, मनोज शिंदे, पूजा पाटील, विशाल पाटील आणि स्वप्निल पाटील यांनी अर्ज दाखल केले.
नागरी बँका व पतसंस्था गटातून पूजा विशाल पाटील, विशाल पाटील, प्रा. मोहन वनखंडे, देवराज पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, रावसाहेब पाटील आणि स्वाती खाडे यांनी अर्ज दाखल केले. इतर संस्था गटातून सुनील कबाडगे, मोहन वनखंडे आणि शंकर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
छाननीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट
अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यासाठी दोनच दिवस उरल्याने राजकीय गटांच्या हालचालींना वेग आला आहे. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक गटांतून अर्ज दाखल केल्याने सध्या उमेदवारांची संख्या मोठी दिसत आहे. अर्जांची छाननी, त्यानंतरची माघार आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर