Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

पोलीस कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून केली असल्याचा गंभीर आरोप NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2026 | 06:02 PM
काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून मुंबईला लाँग मार्च करत विद्यार्थी आले, त्यावेळी त्यांच्यासोबत पोलीसही होते पण मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड केली. मुंबईत या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने दादर येथील टिळक भवन व आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात राहण्याची सोय करण्यात आली होती परंतु रात्री अचानक पोलिसांनी कारवाई केली. ही पोलीस कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून केली असल्याचा गंभीर आरोप NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी केला आहे.

 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके पुढे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती आधीच दिली होती. नाशिकहून मुंबईपर्यंत हे विद्यार्थी आले पण आंदोलनाची परवानगी मागण्यास गेले असता त्यांना परवानगी नाकारली. या विद्यार्थ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या विद्यार्थ्यांची टिळक भवन व मुंबई काँग्रेस कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती. रात्री अचानक पोलिसांनी धाडसत्र सुरु केले. नवी मुंबईत काही जणांना ताब्यात घेतले. काही मुलामुलींना मारहाण करण्यात आली, एक विद्यार्थी बेशुद्ध पडला, काहींना भिवंडीला सोडून दिले.

मुंबई काँग्रेस कार्यालयात झोपलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी उठवले, त्यांना यलो गेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. दादरमधून काहींना उचलून नेले. पोलिसांनी एखाद्या आरोपीसारखे ताब्यात घेतले, काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले. सुरुवातीला दादर पोलीस स्टेशनला घेऊन गेले, नंतर चुनाभट्टी व शेवटी कोपरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. काँग्रेस नेत्यांनी पोलिसांशी सातत्याने संपर्क साधल्यानंतर काहींना सोडून देण्यात आले. मुंबई एसएसयुआयचे अध्यक्ष प्रद्युम यादव म्हणाले की, पोलिसांनी विद्यार्थी व मला जबरदस्तीने उचलून नेले. आधी दादर पोलीस स्टेशनला नेले, दादरमधून चुनाभट्टी पोलीस स्टेशनकडे पोहचवले, वेगवेगळ्या व्हॅन मधून घेऊन गेले, पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली.

आंदोलक विद्यार्थ्यीनींनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी काही सहकाऱ्यांना रस्त्यातूनच ताब्यात घेतले. टिळक भवनमध्ये अंघोळ करून बाहेर येत असतानाच बाथरूममधून पोलिसांनी ताब्यात घेतले. कुठे जायचे हे ते सांगत नव्हेत. पोलीस धमकावत होते. कोपरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले, काँग्रेस नेत्यांचा फोन आल्यानंतर शेवटी सोडले नाहीतर नाशिकला सोडणार होते. पोलीसांनी आम्हाला वॉशरुमलाही जाऊ दिले नाही, पाणीही दिले नाही. आमच्याबरोबर पोलीस व्हॅनमध्ये एकही महिला पोलीस कर्मचारी नव्हती. आंदोनस्थळी घेऊन जातो असे खोटे सांगितले. आश्रम शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे असते, आरोग्याच्या सुविधा नाहीत, सरकारकडे सातत्याने मागण्या करूनही केवळ आश्वासन दिले जाते असे सांगितले.

हे सुद्धा वाचा : निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

मुंबईत आमची राहण्याची सोय नाही, हॉटेलमध्ये राहण्याऐवढे पैसे नाहीत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था केली म्हणून काँग्रेस कार्यालयात आलो, मुख्यमंत्री महोदयांनी राहण्याची व्यवस्था केली असती तर तिकडे गेलो असतो असेही एका विद्यार्थ्यांने सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन उपस्थित होते.

Web Title: Nsuis sagar salunkhe has made serious allegations against the mumbai police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
1

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात
2

२०२६ चा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक! लाखो रुपये खर्चून उभे केलेले खरीप पीक करपले; शेतकरी कर्जाच्या विळख्यात

‘5-50 कोटी दिले असतील, मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या देतील, पण…’; संजय राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल
3

‘5-50 कोटी दिले असतील, मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या देतील, पण…’; संजय राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद
4

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.