
कल्याण: आज संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. सर्व मराठी लोकांसाठी आजचा दिवस मराठी अस्मिता आणि मानाचा दिवस आहे. १ मे १९६० साली स्वात्रंत्र्य महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती करत असताना आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हे देखील महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या दिनानिमित्त सगळीकडे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर कल्याण येथील नावाजलेली गिर्यारोहण संस्था सह्याद्री रॉक ऍडवेंचर ह्या साहसी संस्थेने पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करत कल्याण शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून शहराचे नाव उज्वल केले.
महाराष्ट्र राज्य निर्मिती अर्थात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी येथील सुया सुळका ज्याची उंची सुमारे १०० फूट आहे असा सुळका सर करत राज्याला वंदन करून एक नवीन विक्रम केला आहे. ह्या कामगिरी ची मुख्य बाब म्हणजे सुळका अगदी समुद्रातच असून कामगिरी करत असताना पाण्याने निसडती झालेली पकड त्यामुळे जोखीम जास्त असे पण अनुभवी संघ आणि योजना बंद कामगिरी असल्याने सदर मोहीम यशस्वी करण्यात आली.
कल्याण येथील सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघ हा अश्या विविध कामगिरी करत कल्याण शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उंच करत आहे. हि कामगिरी यशस्वी करण्यात संघाचे दर्शन देशमुख, भूषण पवार, संजय करे, सूचित लाड, सुहास जाधव, स्वप्नील भोईर, स्मितेश येवले, अभिजित कळंबे, अभिषेक गोरे, प्रशिल अंबाडे आणि अंकिता पटलेकर हे सहभागी झाले होते.