Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात…

Murder case Update: चोरीचा बनाव अन् मित्रावर संशय, पण तपासात समोर आला धक्कादायक मास्टरमाइंड! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरून गोंदियाच्या जंगलात एअर होस्टेस वर्षा तुरकरचा खून; पत्नीसह चौघांना अटक, दोन फरार!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 20, 2026 | 11:03 AM
Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात...

Murder case Update: मित्रावर संशय, पण मास्टरमाइंड निघाली पत्नी! कारच्या जीपीएसवरून लोकेशन हेरले अन् जंगलात...

Follow Us
Follow Us:
  • गोंदियाच्या जंगलात एअर होस्टेस वर्षा तुरकरची चाकूने वार करून हत्या
  • अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीने १३ लाखांची सुपारी देऊन जीपीएसवरून लोकेशन हेरून हल्ला घडवला
  • मोनासह चौघांना अटक; दोन आरोपी फरार
Murder case Update: पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर हिची पाच दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील बोंडरानी जंगलात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. वर्षा दिवाळी सणानिमित्त आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर तिचा कॉलेज मित्र नितेश अग्रवाल तिला भेटायला आला होता. ती मित्रासोबत कारने बोंडरानी जंगलात फिरायला गेली होती. मात्र याठिकाणी तिच्यावर तीन ते चार जणांनी अचानक हल्ला केला आणि चाकूने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा: Nashik Crime News: राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!

१३ लाखांची सुपारी देऊन हत्या

घनदाट जंगलात मित्रासोबत फिरायला गेलेल्या विवाहितेची अशाप्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. तिच्यासोबत केवळ तिचा मित्र होता. त्यामुळे त्यानेच ही हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ही हत्या नितेशनं नव्हे तर त्याची पत्नी मोना अग्रवालने घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मोनाने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या शाहरूख खान पठाण याला १३ लाखांची सुपारी दिली होती.

पतीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीने उगवला सूड

आपला पती नितेश याचे एअर होस्टेस वर्षा तुरकर हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मोनाला होता. यातूनच तिने सुपारी देऊन ही हत्या घडवली. मात्र वर्षा आणि नितेश जंगलात फिरायला गेले होते. अशात यांचं लोकेशन हल्लेखोरांना कसं मिळालं? याबाबत पोलीस तपासात चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे.

कारच ठरली मृत्यूचा सापळा

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नितेश वापरत असलेली कार ही त्याची पत्नी मोना हिच्याच नावावर होती. मोनाने कारच्या ‘टोयोटा आय-कनेक्ट’ या जीपीएस ॲपचा आयडी आणि पासवर्ड आरोपींच्या मोबाईलमध्ये टाकून दिला होता. याच जीपीएस लोकेशनचा माग काढत आरोपींनी बोंडरानीचे जंगल गाठलं आणि वर्षावर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.

हेही वाचा: Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

नितेशवर घातपाताचा संशय पण पत्नी निघाली मास्टरमाइंड

सुरुवातीला वर्षाची हत्या कुणी केली? याबाबत पोलिसांकडे काहीच पुरावे नव्हते. नितेशनेच फोन करून वर्षावर हल्ला झाल्याची माहिती दिली होती. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचं नितेशनं सांगितलं होतं. मात्र वर्षाच्या अंगावरील दागिने तसेच होते. त्यामुळे नितेशनेच काहीतरी घातपात केला असावा, असा संशय पोलिसांना होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गूढ गुन्ह्याचा उलगडा करत मुख्य सूत्रधार पत्नीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. इमरान करीम शेख, शाहरुख खान पठाण, कुणाल कुंभलकर आणि मोना नितेश अग्रवाल अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोंदियातील बोंडरानी जंगलात वर्षा तुरकर यांची हत्या कोणी घडवून आणली?

    Ans: पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नितेश अग्रवाल याची पत्नी मोना अग्रवाल हिने पतीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून १३ लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली.

  • Que: हल्लेखोरांना वर्षा आणि नितेश यांचे लोकेशन कसे समजले?

    Ans: नितेश वापरत असलेली कार मोनाच्या नावावर होती आणि तिने कारच्या 'टोयोटा आय-कनेक्ट' जीपीएस ॲपचा आयडी व पासवर्ड आरोपींना दिला होता, ज्याद्वारे लोकेशन ट्रॅक करून हल्लेखोर जंगलात पोहोचले.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी किती जणांना अटक केली आहे?

    Ans: स्थानिक गुन्हे शाखेने मोना नितेश अग्रवाल, शाहरुख खान पठाण, इमरान करीम शेख आणि कुणाल कुंभलकर या चौघांना अटक केली असून उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Gondia bondrani forest air hostess murder contract killing gps tracking sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • GPS
  • murder case news
  • pune murder news
  • tracking

संबंधित बातम्या

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!
1

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

Murder Pune: “पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!” पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून…
2

Murder Pune: “पाणी भरण्याचा किरकोळ वाद ठरला जीवघेणा!” पुण्याच्या बालेवाडीत १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून…

Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठलं! प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने केले वार अन्
3

Murder Case: दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आली अन् काळाने गाठलं! प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून तरुणाने धारदार शस्त्राने केले वार अन्

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…
4

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.