Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेरीवाला सर्वेक्षणास एक महिन्यांची मुदतवाढ; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची माहिती

महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणाची मुदत ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत होती, परंतु पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता कोणताही पथ विक्रेता या सर्वेक्षणातून वंचित राहू नये यासाठी पथ विक्रेता सर्वेक्षणास ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2022 | 07:24 PM
फेरीवाला सर्वेक्षणास एक महिन्यांची मुदतवाढ; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणाची मुदत ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत होती, परंतु पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता कोणताही पथ विक्रेता या सर्वेक्षणातून वंचित राहू नये यासाठी पथ विक्रेता सर्वेक्षणास ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.

सर्वेक्षण विनामूल्य असून ते बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. तसेच बायोमेट्रीक सर्वेक्षण हे प्रत्यक्ष जागेवरच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने क्षेत्रिय कार्यालय किंवा मुख्य कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता नाही. नोंदणी व सर्वेक्षण सुलभ पद्धतीने होण्यासाठी शहरातील संबंधित फेरीवाल्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधारकार्ड लिंक (संलग्न) करून या सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी तसेच उद्योजक यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण शासनाने विकसित केलेल्या हॉकर्स अॅपच्या माध्यमातून बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण ऑनलाईन असल्यामुळे सर्वेक्षणावेळी मोबाईल संबधित फेरीवाल्यांच्या क्रमांकावर आलेला ओटीपी महत्वाचा असून तो महापालिकेच्या सर्वेक्षण प्रगणकास हे सर्वेक्षण करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

फेरीवाला सर्वेक्षणासाठी संबधित फेरीवाल्यांकडे आधारकार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डचे पहिले पान व शेवटचे पान यांची एका पानावरील छायांकित असणे अनिवार्य आहे. आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वतःजवळ असावी. दिव्यांग, घटस्फोटीता, परितक्ता महिलांसाठी अनुषंगिक पुराव्याची प्रत असणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना यापूर्वी पथविक्रेता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांनी प्रमाणपत्र सादर करावे. यापूर्वी अतिक्रमण विभागाकडून काही कारवाई झाली असेल तर संबधित दंडाची पावती सोबत असणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडील लेटर ऑफ रेकमंडेशनची प्रत किंवा पीएम स्वनिधी कर्ज प्राप्त झाल्याचे कागदपत्रे तसेच कोविड १९ च्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना देण्यात आलेला पास आदी कागदपत्रे संबंधित फेरीवाल्यांनी सर्वेक्षणावेळी स्वतःजवळ बाळगणे आवश्यक आहे.

Web Title: One month extension of hawker survey information of additional commissioner jitendra wagh nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 07:24 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Pimpri

संबंधित बातम्या

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
1

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार
2

शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार

राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार
3

राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
4

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.