Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाई वाईटाच्या मार्गावर! ‘ऑनलाईन मटका तेजीत’; पोलिसांचे दुर्लक्ष?

सध्या ऑनलाईन मटका खेळाचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा खेळ तरुणाईला आर्थिक अडचणीत टाकत असताना, मटका व्यावसायिक मात्र प्रचंड नफा मिळवत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2025 | 11:59 AM
तरुणाई वाईटाच्या मार्गावर! खंडाळ्यात 'ऑनलाईन मटका तेजीत'; पोलिसांचे दुर्लक्ष?

तरुणाई वाईटाच्या मार्गावर! खंडाळ्यात 'ऑनलाईन मटका तेजीत'; पोलिसांचे दुर्लक्ष?

Follow Us
Follow Us:

शिरवळ/ जीवन सोनवणे : खंडाळा तालुक्यात शिरवळ आणि परिसरात सध्या ऑनलाईन मटका खेळाचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा खेळ तरुणाईला आर्थिक अडचणीत टाकत असताना, मटका व्यावसायिक मात्र प्रचंड नफा मिळवत आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या सहज उपलब्धतेमुळे तरुण पिढी या व्यसनात अडकत आहे, ज्याचा फटका त्यांच्या कुटुंबांनाही बसत आहे.

सुरुवातीला केवळ मजेसाठी खेळले जाणारे हे जुगाराचे खेळ आता काही जणांसाठी सवयीचे झाले आहे. छोट्या रकमेसाठी सुरू होणाऱ्या या खेळात तरुण मोठ्या प्रमाणावर पैसे गमावत आहेत. कर्जबाजारीपण, आर्थिक ताणतणाव, कौटुंबिक कलह आणि शैक्षणिक नुकसान हे या व्यसनाचे प्रमुख परिणाम दिसून येत आहेत. खंडाळा तालुक्यातील काही गावांमध्ये या व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. अनेक तरुण शिक्षण आणि नोकरीकडे दुर्लक्ष करून आपला वेळ आणि पैसा मटकामध्ये घालवत आहेत. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांना कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागत आहे. मटका व्यावसायिक मात्र या परिस्थितीचा फायदा घेत मोठी कमाई करत आहेत. त्यांचे नेटवर्क ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्सद्वारे देशभर पसरले आहे. कमी गुंतवणुकीत भरपूर नफा मिळणाऱ्या या व्यवसायामुळे ते आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहेत.

तरुणाई भिकेला लागली

मटका हा सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी खेळला जातो, परंतु हळूहळू तो व्यसनाचे रूप धारण करतो. कर्ज काढून पैसे लावणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर होत आहे. रोजगाराऐवजी जुगारावर अवलंबून असलेल्या तरुणांना वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे, परिणामी ते नैराश्यात ढकलले जात आहेत. अशा प्रकारांमुळे काही तरुणांनी आत्महत्येचा मार्ग देखील स्वीकारला आहे.

व्यावसायिकांची चांदी

मटकामध्ये गुंतवणूक करणारे व्यावसायिक आणि दलाल मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहेत. बेकायदेशीर व्यवहारातून लाखो रुपये वसूल केले जात आहेत. हे पैसे काळ्या बाजारात गुंतवले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. तांत्रिक साधनांचा वापर करून हे लोक आपल्या व्यवसायाला चालना देत आहेत आणि सामान्य जनतेच्या संकटाचा फायदा घेत आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष

मटक्याच्या या वाढत्या समस्येवर पोलिसांचे लक्ष अत्यंत नगण्य आहे. तक्रारी असूनही पोलिसांनी कारवाई टाळल्यामुळे मटका व्यवसायिकांचे धाडस अधिकच वाढले आहे. काही ठिकाणी पोलिसांवरच मटकाबाजांशी हातमिळवणी केल्याचे आरोप आहेत. यामुळे गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही.

समाजाच्या जबाबदारीची गरज

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनासोबतच समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. युवकांमध्ये जनजागृती करून त्यांना या व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासनाने कठोर उपाययोजना करून ऑनलाईन मटकावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, तरुणाईचे भवितव्य उद्ध्वस्त होऊन सामाजिक व्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.

Web Title: Online matka is being played on a large scale in khandala taluk nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • khandala
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
1

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
2

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण
3

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

Hingoli Earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! 3.5 रिश्टर तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Hingoli Earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! 3.5 रिश्टर तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.