Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणेंच्या जन आक्रोश मोर्चाला इंदापुरात विरोध; सकल मराठा समाजाच्या 4 कार्यकर्त्यांना अटक

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे होणाऱ्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला विरोध दर्शविणाऱ्या चार सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2024 | 02:41 PM
नितेश राणेंच्या जन आक्रोश मोर्चाला इंदापुरात विरोध; सकल मराठा समाजाच्या 4 कार्यकर्त्यांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे होणाऱ्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला विरोध दर्शविणाऱ्या चार सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात पथ संचलन करण्यात आले.

इंदापूर शहरातील विरश्री मालोजीराजे भोसले गढी भोवती असणारे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नितेश राणे इंदापूरमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत. नितेश राणेंच्या समर्थकांनी यासंदर्भात दावा केला आहे.

परंतु, काही जातीवादी संघटनेची लोकं इंदापूर मध्ये येऊन इंदापूर मध्ये असणारा जातीय सलोखा बिघडवून त्यांच्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या मोर्चास परवानगी नाकारावी अशी मागणी सकल मराठा समाजाने पोलीस प्रशासनाकडे केली होती. परंतु, पोलीस प्रशासनाने सदरील मोर्चास परवानगी दिली आहे. मोर्चा रामवेस नाका येथून निघणार आहे. इंदापूर नगरपरिषद मैदानात सभा होणार आहे.

तसेच नितेश राणे यांच्याकडून जरांगे पाटलांविरोधात जी भूमिका घेतली जात आहे त्याला विरोध म्हणून नितेश राणे यांनी इंदापूर मध्ये येऊ नये, आम्ही त्यांना इंदापूरमध्ये येऊ देणार नाही. जर ते इंदापूर मध्ये आले तर त्यांची सभा आम्ही उधळून लावू असा इशारा नितेश राणे यांना सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये वातावरण तापले जाणार आहे.

 

Web Title: Opposition to nitesh ranes march in indapur 4 activists of sakal maratha samaj arrested nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 02:16 PM

Topics:  

  • BJP
  • Maratha Samaj
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात
1

West Bengal Politics: “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात

Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…
2

Maharashtra Politics: घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती
3

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
4

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.