Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: वाईत अर्धवट विकासकामांवरून संताप; ठेकेदार बेपत्ता, प्रशासन मौन

शहरातील गणपती मंदिर पुल परिसरातील पथदिवे बसवण्याचे काम निवडणूक काळात सुरू करून नंतर अचानक थांबवण्यात आल्याने वाईकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 09:41 PM
Wai News: वाईत अर्धवट विकासकामांवरून संताप; ठेकेदार बेपत्ता, प्रशासन मौन
Follow Us
Follow Us:

वाई : शहरातील गणपती मंदिर पुल परिसरातील पथदिवे बसवण्याचे काम निवडणूक काळात सुरू करून नंतर अचानक थांबवण्यात आल्याने वाईकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तब्बल तीन महिन्यांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडून असून ठेकेदार बेपत्ता झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र याबाबत नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची भूमिका संशयास्पद शांततेची असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

निवडणुका संपताच कामाला ब्रेक लागल्याने हे काम केवळ राजकीय दिखाव्यासाठीच सुरू करण्यात आले होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. “ठेकेदार नेमका कुठे आहे? आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई का करत नाही?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, उभारण्यात आलेल्या पथदिव्यांच्या खांबांसाठी केलेल्या बांधकामाच्या दर्जाबाबतही गंभीर शंका उपस्थित करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत असून संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणात विरोधी पक्षानेही अपेक्षित भूमिका घेतलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. नवनियुक्त विरोधी पक्ष नेतेही मौन बाळगत असल्याने “विरोधक नेमके कधी बोलणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब

याचबरोबर कृष्णा नदीपात्रातील दगड बसवण्याचे कामही अर्धवटच ठेवण्यात आले आहे. एसटीपी लाईनसाठी काढण्यात आलेले दगड पुन्हा न बसवल्याने शासनाचा खर्च वाया गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर असताना हे दगड प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि संबंधित नगरसेवकांनी या गंभीर विषयावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे.

वाईकरांचा थेट सवाल :
अर्धवट कामे का थांबवली?
ठेकेदार कुठे गायब झाला?
आणि ही कामे पूर्ण नेमकी कधी होणार?

प्रशासनाने तातडीने यावर स्पष्टीकरण देऊन अर्धवट कामे पूर्ण करावीत, अन्यथा जनतेचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Wai Nagarparishad Budget: वाई नगरपरिषदेचा ९२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शहर विकासासह पर्यटनावर भर

Web Title: Outrage in wai over incomplete development works contractor missing administration silent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Wai News

संबंधित बातम्या

वाई पालिकेचा भोंगळ कारभार उघड! निकृष्ट दर्जाच्या ‘नो पार्किंग’ फलकांवर लाखोंचा खर्च? विरोधकांचे मौन संशयास्पद
1

वाई पालिकेचा भोंगळ कारभार उघड! निकृष्ट दर्जाच्या ‘नो पार्किंग’ फलकांवर लाखोंचा खर्च? विरोधकांचे मौन संशयास्पद

पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम
2

पावसाळ्यात सफाई मित्रांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार; पांचगणी नगरपरिषद व हिलदारीचा मान्सूनपूर्व उपक्रम

Wai News: वाईतील धोम धरण परिसरात विनापरवाना दूध वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
3

Wai News: वाईतील धोम धरण परिसरात विनापरवाना दूध वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!
4

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.