Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!

वाई तालुक्यातील मेणवली येथील नेहर ओढ्यावरील नवीन पूल पहिल्याच पावसात वादात सापडला आहे. निकृष्ट बांधकाम आणि चुकीच्या उंचीमुळे रस्ता जलमय झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 06:17 PM
मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे

मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे

Follow Us
Follow Us:
  • मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे
  • पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी
  • अपघातांचा धोका वाढला!
वाई: वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील मेणवली येथील नेहर ओढ्यावर उभारण्यात आलेला पूल पहिल्याच पावसात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, रस्त्याची चुकीची उंची, पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक गटारींचा अभाव आणि अपुऱ्या नियोजनामुळे ओढ्याचे पाणी थेट रस्त्यावर येत असून वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूल बांधताना रस्त्याची उंची योग्य प्रमाणात ठेवण्यात आली नाही. त्यामुळे पुलालगतचा रस्ता खड्ड्यासारखा खोलगट झाला असून पावसाचे पाणी तेथे मोठ्या प्रमाणात साचत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या गटारी (साऱ्या) व्यवस्थित बांधण्यात आल्या नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.

परिणामी रस्ता जलमय होत असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर तीव्र वळण असल्याने समोरून येणारी वाहने आधीच दिसत नाहीत. त्यातच पुलालगत वाढलेल्या झाडांमुळे दृष्टीक्षेप आणखी कमी झाला आहे. अशा परिस्थितीत अचानक रस्त्यावर पाणी आल्यास वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा

विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या परिसरात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील संबंधित यंत्रणेने या धोकादायक ठिकाणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

पूर्वी या ठिकाणी कमी उंचीचा पूल असल्याने पावसाळ्यात ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असे आणि पश्चिम भागातील गावांचा संपर्क काही काळ विस्कळीत होत असे. ही समस्या कायमची दूर व्हावी म्हणून नवीन पूल उभारण्यात आला. मात्र पुलाची उंची वाढवली असली तरी रस्त्याचे योग्य लेव्हलिंग, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि बाजूंची मजबुतीकरणाची कामे दर्जेदार पद्धतीने न झाल्याने आजही नागरिकांना त्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आगामी काळात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून रस्त्याची उंची दुरुस्त करणे, पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य गटारी बांधणे, रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत उभारणे, खचलेले भाग दुरुस्त करणे, झाडांची छाटणी करणे आणि इशारा फलक लावणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

Web Title: Wai menavali nehar odha bridge defective construction dangerous for commuters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Satara News
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.