Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: धक्कादायक! महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता, 51 जणांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्रे

Pahalgam Terror Attack News : केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 26, 2025 | 04:06 PM
महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता, 51 जणांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्रे

महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता, 51 जणांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्रे

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack in Marathi: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून पाकिस्तानातील लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.गृहमंत्र्यांच्या या आदेशानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आली. या हल्ल्यानंतर, भारत सरकारने प्रथम भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार स्थगित केला. . भारताने पाकिस्तानला औपचारिक पत्र लिहून सिंधू पाणी करार स्थगित केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत महाराष्ट्र सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचदरम्यान आता महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Pahalgam Terror Attack: नांग्या ठेचण्यापूर्वीच पाकिस्तानची पळताभुई…: शाहबाज शरीफ नरमले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये सिंधू पाणी करार पुढे ढकलण्याचा निर्णयही समाविष्ट होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६० पासून सिंधू पाणी करार लागू आहे. सिंधू नदी ही पाकिस्तानची जीवनरेखा मानली जाते. २१ कोटींहून अधिक लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिंधू आणि तिच्या चार उपनद्यांवर अवलंबून आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत महाराष्ट्र सोडण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यापैकी जास्तीत जास्त ६ पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार केली आहे. ही यादी पोलिस ठाण्यांना देण्यात आली आहे. पाकिस्तानी व्हिसा असलेला कोणीही येथे ४८ तासांपेक्षा जास्त काळ राहू नये यावर लक्ष ठेवले जाईल. यानंतरही जर लोक थांबले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने २७ एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे १८ प्रकारचे सर्व व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर, अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना शोधून ते तातडीने तिथे जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

अमित शहांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. राज्यातील ४८ शहरांमध्ये एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. तर नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी आणि ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक आढळले. मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त ५१ पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रे मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीय.

योगेश कदम काय म्हणाले?

सध्या महाराष्ट्रात ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक आहेत. यातील एक कॉलम अनट्रजसेबल पाकिस्तानी नागरिकांचा आहे. ज्यांच्या व्हीजाची मुदत संपलीय. भारतीय एजन्सी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांना पाकिस्तानात परत पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्याशी संपर्क साधला जात नाही किंवा सापडत नाहीयेत अशी हे पाकिस्तानी लोक आहेत, असं योगेश कदम यांनी सांगितले. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टाईम व्हिसा असलेल्यांना फक्त दोन दिवसांत म्हणजे २८ तारखेपर्यंत भारत सोडण्यास सांगितले जाते. ज्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत त्यांना दोन दिवसांची मुदतवाढ दिली जाईल. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत देश सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणं अजुन सुरु आहे. त्यामुळे आकडेवारी बदलू शकते, असंही योगेश कदम म्हणाले.

Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तान संपणार! नेव्ही, आर्मीने शत्रूला दिला ‘हा’ निर्वाणीचा इशारा

Web Title: Pahalgam terror attack 107 pakistani citizens missing in maharashtra 5023 pakistanis found in 48 cities of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 04:06 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • pahalgam
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
4

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.