Photo Credit- Social media पाकिस्तान घाबरला; शाहबाज शरीफांची माघार
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडूनही इस्लामाबादविरुद्ध अनेक कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली आहेत. यातंर्गत १९६० च्या सिंधू पाणी करारानुसार सिंधू, रावी आणि चिनाब नद्यांचे पाणी बंद करण्यात आले आहे. याशिवाय अटारी एकात्मिक तपासणी नाके बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ निलंबित करणे, यासह इतर पावले समाविष्ट आहेत. भारताच्या या निर्णयांनंतर, पाकिस्ताननेही शिमला करार रद्द करणे आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे यासारखी काही पावले उचलली आहेत. पण यानंतरही भारताने आपली ताकद दाखवल्यानंतर आता पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे.
“काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ जणांच्या हत्येच्या कोणत्याही “निष्पक्ष आणि पारदर्शक” चौकशीत पाकिस्तान सहभागी होण्यास तयार असल्याची भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घेतली आहे. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि तो स्वतः दहशतवादाला बळी पडला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तान संपणार! नेव्ही, आर्मीने शत्रूला दिला ‘हा’ निर्वाणीचा इशारा
एका वृ्त्तवाहिनीच्या वृत्तानुसार, काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग आउट परेडला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत कोणत्याही विश्वासार्ह तपासाशिवाय किंवा पुराव्याशिवाय पाकिस्तानवर निराधार आणि खोटे आरोप करत आहे. एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
शाहबाज शरीफ एकदा जम्मू आणि काश्मीरबाबत बोलताना म्हणाले की, “मला काश्मीरचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल, कारण राष्ट्राचे संस्थापक कायद-ए-आझम मोहम्मद अली जिना यांनी बरोबर म्हटले होते की, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे. पाकिस्तानने नेहमीच सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आहे. दहशतवादाविरुद्ध जगातील आघाडीचा देश म्हणूनही त्यांनी पाकिस्तानचे वर्णन केलं आहे. तसेच, आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागले, ज्यामध्ये ९०,००० लोकांचा मृत्यू झाला आणि ६०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले.”
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा नेपाळमध्ये तीव्र निषेध; निदर्शकांनी केली ‘ही’ मोठी मागणी
पुढे बोलताना शरीफ म्हणाले, “महंमद अली जिन्ना यांनी योग्यच म्हटले होते की, ‘काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे.’ दुर्दैवाने, अमेरिकेने अनेक प्रस्ताव मांडले असतानाही आजतागायत हा प्रश्न सुटलेला नाही. काश्मिरी जनतेला स्वतःच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि पाकिस्तान नेहमीच या अधिकाराचा पाठिंबा देत राहील. शांतता ही आमची प्राथमिकता आहे, मात्र आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.”