इंडियायन नेव्ही, आर्मीचा पाकिस्तानला इशारा (फोटो- सोशल मिडिया/ट्विटर)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारताने राफेल, सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. तर लष्कर आणि नौदल देखील पूर्ण तयारीत आहे. भारत काहीतरी मोठे करणार अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यातच आता भारतीय नौदल आणि लष्कराने एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवरुण पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असताना भारतीय नौदलाने एक ट्वीट केले आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्सवर भारतीय नौदलाने MissionReady, Anytime, Anywhere, Anyhow! अशा प्रकारची पोस्ट केली आहे. या पोस्टचे अनेक प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. भारत पाकिस्तानविरुद्ध मोठे पाऊल उचलणार असे म्हटले जात आहे. तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले जात आहे.
Always Prepared, Ever Vigilant – #IndianArmy pic.twitter.com/NIHWvWF9oM
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) April 26, 2025
दुसरीकडे इंडियन आर्मीने देखील अशाच प्रकारची पोस्ट केली आहे. त्यामध्ये “Always Prepared, Ever Vigilant असे म्हणण्यात आले आहे. भारत हल्ला करण्याची भीती पाकिस्तानला वाटत आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आक्रमण युद्धाभ्यास सुरू केला आहे.
Power in unity; Presence with Purpose
#MissionReady#AnytimeAnywhereAnyhow pic.twitter.com/EOlQFyXFgJ
— IN (@IndiannavyMedia) April 26, 2025
भारताकडे १६ तर पाकिस्तानकडे २ पाणबुड्या
एका बाजूला कराची बंदरावरील सॅटेलाइट फोटोज समोर आले आहेत. यावरून पाकिस्तानची नौदल ताकद भारतासमोर फारच कमी असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक अडचणीत असलेला पाकिस्तान लष्करी ताकद सक्षम करण्यासाठी असमर्थ आहे. पाकिस्तानकडे केवळ २ तर भारताकडे १६ पाणबुड्या आहेत. लष्करी ताकदीमध्ये भारत पाकिस्तानच्या खूप पुढे आहे.
अमरनाथ यात्रेवरून काय म्हणाले पीयूष गोयल?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, भारत दहशतवाद्यांना घाबरणार नाही. दहशतवाद्यांना योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच अमरनाथ यात्रा स्थगिती केली जाणार नाही. अमरनाथ यात्रा रद्द केली जाणार नाही. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी अनेक भाविकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पियुष गोयल यांनी अमरनाथ यात्रेबाबत भाविकांना आश्वासन दिले आहे. काश्मीरमध्ये पुन्हा लवकरच पर्यटन सुरु होईल. काश्मीरचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही.
Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान
अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. हि यात्रा अनंतनाग मधून सुरु होणार आहे. पहलगाम ट्रेक आणि गंदेरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गापासून सुरु होणार आहे. भाविकांच्या भोवती सुरक्षेचें मोठे कडे असणार आहे. यात्रा ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी भारतीय लष्कराने अत्यंत चोख सुरक्षा व्यव्था ठेवली जाणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे.