Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Palghar Drought Relief Controversy : राज्य सरकारने जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांच्या दुष्काळसदृश यादीतून संपूर्ण पालघर जिल्ह्याला तांत्रिक निकषांमुळे वगळण्यात आल्यामुळे येथील आदिवासी शेतकरी सरकारी मदतीपासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत. जुलैमध्ये मुसळधार पाऊस झाला असला, तरी सध्या भाताचे पीक संवेदनशील टप्प्यावर आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 28, 2026 | 11:26 AM
पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? ( सौजन्य - सोशल मीडिया )

पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पालघर जिल्हा सरकारने दुष्काळातून वगळला
  • आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
  • तांत्रिक निकषाचा बसला फटका
Palghar Drought Relief Controversy : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून, तेथे १२ विविध उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत. मात्र, हा निर्णय घेताना जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमानात १८ टक्क्यांपेक्षा जास्त तूट असल्याचा तांत्रिक निकष लावल्याने संपूर्ण पालघर जिल्हा या दुष्काळातून वगळला गेला आहे. केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता पालघरमधील पिकांची प्रत्यक्ष स्थिती पाहून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी येथील आदिवासी शेतकऱ्यांमधून होत आहे. ( Palghar Drought Relief Controversy ) 

Ganesh Visarjan : विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर! 6500 हून अधिक जवान तैनात; CCTV अन् Drone ने देखरेख

शासनाकडून झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर १’ अंतर्गत प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे पंचनामे, जिओ-टॅगिंग व छायाचित्रांसह सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, पालघरचा यात समावेश नसल्याने येथील शेतकरी सरकारी मदतीपासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत. जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला असला, तरी भाताची रोवणी उशिरा झाली. सद्यस्थितीत भात पीक पोटरीमध्ये (दाणे भरण्याच्या अवस्थेत) आले असून, पिकाच्च्या वाढीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने ऐन भरात आलेले भात पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे.

फेरसर्वेक्षणाची गरज

इतर जिल्ह्यांप्रमाणे पालघरमध्ये बारमाही सिंचनाची सोय, विहिरींचे जाळे किंवा रब्बी हंगामात हरभरा-गहू अशी दुबार पिके घेण्याची परिस्थिती नाही. येथील बहुतांश आदिवासी शेतकरी केवळ पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या भात पिकावरच वर्षभराची गुजराण करतात. जुलैतील पावसाच्या नोंदीच्या आधारे तालुक्यांना वगळणे येथील गरीब शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिकांबी सद्य स्थिती पाहून फेरसर्वेक्षण अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी केली जात आहे.

पालघरला दुष्काळातून वगळणे अन्यायकारक

माजी सभापती तथा शेतकरी प्रदीप वाघ यांनी स्पष्ट केलं की “राज्यातील इतर भागांपेक्षा पालघरमधील शेतीची रचना पूर्णपणे वेगळी आहे. भाताचे पीक सच्या संवेदनशील टप्प्यावर असून पाऊस न पडल्यास उत्पादनात प्रचंड घट होईल. हाताशी आलेले पीक जाण्याची भीती असताना पालघरला दुष्काळातून वगळणे अन्यायकारक आहे”.

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

Web Title: Palghar excluded from drought list tribal farmers left without government aid marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • drought news
  • Immediate Relief
  • palghar

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘मराठवाड्यातील कुठल्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही,’ अशोक चव्हाणांचा शब्द, दोन तालुक्यांवरून राजकारण
1

Maharashtra Drought : ‘मराठवाड्यातील कुठल्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही,’ अशोक चव्हाणांचा शब्द, दोन तालुक्यांवरून राजकारण

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
2

Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
3

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र
4

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.