Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Palghar News : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा धाब्यावर बसवणाऱ्या विराज प्रोफाइल्स लि. युनिट-II, इंडाको जीन्स आणि स्टॅनसेओ एनव्हायरोच या तीन बड्या उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यासारखी बरीच कारणं समोर आली आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 15, 2026 | 11:46 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तारापूरमधील ३ बड्या उद्योगांना MPCB चा दणका!
  • प्रदूषण नियंत्रणात त्रुटी आढळल्याने ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • सांडपाणी आणि धुळीमुळे तारापूरमध्ये प्रदूषण
Palghar News : तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न नियंत्रणात आल्याचा दावा केला जात असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत गंभीर नियमभंग समोर आले आहेत. विराज प्रोफाइल्स लिमिटेड युनिट-II, इंडाको जीन्स प्रा. लि. आणि स्टॅनसेओ एनव्हायरोच इंडिया प्रा. लि. या तीन उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणेबाबत त्रुटी आढळल्याने मंडळाने त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास उद्योग बंद करण्यासह पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ( Palghar News ) 

Palghar FDA Action : पालघरमध्ये FDA चं ‘ऑपरेशन क्लिन’! 1 कोटी 37 लाखांचा बनावट अन्नसाठा सील, 5 परवाने निलंबित, गुटख्यावरही कारवाई

बोईसर-तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाबाबत तक्रारी होत असतानाच अलीकडील पाहणीत काही उद्योगांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा बसवणे पुरेसे नसून ती प्रत्यक्षात कार्यरत आहे का, याची नियमित तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. येथील प्रदूषणाबाबत यापूर्वीही विविध कारवाया झाल्या आहेत. मात्र, कारवाईनंतर काही काळाने पुन्हा नियमभंगाच्या घटना समोर येत असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची परिणामकारकता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. नोटिसा, कारवाई आणि आश्वासनांच्या पलीकडे जाऊन तारापूरमधील प्रदूषण प्रत्यक्षात किती कमी झाले, याचे मोजमाप करण्याची मागणी केली जात आहे.

परवानग्यांशिवाय नवीन प्लांट

स्टॅनसेओ एनव्हायरोच इंडिया प्रा. लि.च्या बाबतीत आवश्यक मंडळाची संमती न घेता दुसऱ्या इमारतीत नवीन प्लांट आणि यंत्रसामग्री बसवण्यात परवानगीही सादर करण्यात आलेली नसल्याचे नोटिसीत नमूद आहे.

भूमिगत पाईपलाइनने सांडपाणी बाहेर ?

इंडाको जीन्स प्रा. लि. व्या पाहणीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी भूमिगत पाइपलाइनच्या माध्यमातून बायपास करून सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून, संबंधित भूमिगत पाइपलाइन एमआयडीसीकडून डिस्कनेक्ट करण्यात आल्याचे मंडळाला आढळून आले आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेर सोडले जात असल्यास त्याचा परिसरातील जलस्रोतांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रदुषण नियंत्रणावर प्रश्न

विराज प्रोफाइल्स लिमिटेड युनिट-IIच्या पाहणीत बँग हाऊस परिसरातून मोठ्या प्रमाणावर धूळ उत्सर्जित होत असल्याचे आढळले. धुळीमिश्रित अल्कधर्मी पाणी स्टॉर्म वॉटरमध्ये मिसळत असल्याचेही मंडळाने नोंदवले आहे. काही स्क्रबर बंद स्थितीत असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. ईटीपी-बी आणि ईटीपी-सी कार्यरत नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. या उद्योगातील ईटीपीमधील पाण्याचा पीएच १० ते ११, तर धुळीमिश्रित स्टॉर्म वॉटरचा पीएच १० ते १२ आढळला. पाण्याच्या गुणवत्तेची ही स्थिती निर्धारित मानकांच्या तुलनेत चिंताजनक असल्याचे मंडळाच्या निरीक्षणातून उजेडात आले आहे.

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

Web Title: Palghar news mpcb issues show cause notices three major industries tarapur midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Air Pollution
  • Marathi News
  • MIDC
  • Palghar news
  • pollution
  • Tarapur MIDC

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.