(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव
एफडीएच्या पथकाने हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे व अन्य अन्न आस्थापनांची तपासणी केली. यावेळी अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, भेसळ, कीटक व उंदीर नियंत्रणाची व्यवस्था, कामगारांची वैद्यकीय तपासणी, अग्निशामक यंत्रणा तसेच अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या वैध परवान्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच तडजोड दंडापोटी २ लाख ७ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी केवळ खासगी व्यावसायिकांची नसून शासकीय आस्थापनांचीही असल्याचे एफडीएच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातील कँटीनमध्येही त्रुटी आढळल्याने कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला अभय दिले जाणार नसल्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे. हॉटेलमध्ये पनीरपासून तयार केलेल्या पदार्थांबाबत ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी पदार्थांच्या स्वरूपाची स्पष्ट माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर एफडीएची करडी नजर राहणार आहे.
प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधातही एफडीएने स्वतंत्रपणे सात कारवाया केल्या. या कारवायांमध्ये ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पनीरच्या गुणवत्तेबाबत एफडीएकडून विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत ३२ पनीरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी नऊ नमुने प्रमाणित, तर एक नमुना असुरक्षित आढळला आहे. उर्वरित २२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. हॉटेल आणि उपाहारगृहांमध्ये पनीरच्या नावाखाली निकृष्ट किंवा पर्यायी पदार्थ ग्राहकांना देण्यात येत नाहीत ना, याचीही तपासणी केली जात आहे.
गणपती, नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांवरही एफडीएची विशेष नजर राहणार आहे. मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवा, मावा, दूध, तूप व अन्य कच्चा माल यांची तपासणी केली जाणार आहे. मिठाईंमध्ये भेसळ अथवा निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.



