सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ ( सौजन्य - सोशल मीडिया )
हा सगळा पसंग इतका भयानक होता की यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुई पाड्यातील शेतकरी रमेश जाधव यांनी नेहमीप्रमाणे घरासमोरील झाडांना जनावरे बांधली होती. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक जनावरांवर हल्ला केला.
शनिवारी पहाटे जाधव कुटुंबीय जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असता गोठ्याजवळ रक्ताचे डाग व जनावरांचे अवशेष आढळून आले. हा सगळा प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. अंगावर काटा आणणारी दृश्ये होती. सगळ्या प्रसंगानंतर त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांपूर्वी सफाळे पूर्वेतील साखरे परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले होते.
वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता थेट लोकवस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. जनावरांवर झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्या माणसांची शिकार करायला सुरुवात करेल. माणसांच्या रक्ताची चटक लागल्यानंतर मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृत जनावरांची नुकसानभरपाई तातडीने द्यावी आणि बिबट्याच्या बंदोबस्तासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण असून बिबट्याच्या धाकाखाली आयुष्य जगण्याची वेळ आली आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे.






