Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले

Vadhavan Port Protest : डहाणू तालुक्यातील वरोर येथे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि विविध संघटनांच्या वतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय जमावबंदी आदेशाविरोधात 'सविनय कायदेभंग' आंदोलन करण्यात आले. ग्रीनफिल्ड महामार्गाच्या सेवा रस्त्याचे नियमबाह्य काम रोखत आंदोलकांनी हाताने दगड बाजूला सारत निषेध केला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 03, 2026 | 11:48 AM
वाढवण बंदरविरोधात रणशिंग! ( सौजन्य - सोशल मीडिया )

वाढवण बंदरविरोधात रणशिंग! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वाढवण-विरोधकांचा ‘सविनय कायदेभंग’
  • वरोर येथे जमावबंदीला आव्हान;
  • सेवा रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी दिली धडक
Vadhavan Port Protest : गांधी जयंतीच्या दिवशी शुक्रवारी वरोर येथे वाढवण बंदरविरोधकांनी प्रशासनाच्या जमावबंदी आदेशाला आव्हान देत सविनय कायदेभंग आंदोलन केले. ग्रीनफिल्ड महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या कामात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कामाच्या ठिकाणी धडक दिली. सेवा रस्त्यासाठी आणण्यात आलेले दगड आंदोलकांनी हाताने बाजूला करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. ( Vadhavan Port Protest )

वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि सहयोगी संघटनांच्या वतीने वरोर-चिंचणी मार्गालगत शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सेवा रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा वळवला. ‘जल-जंगल-जमीन आमचा अधिकार’, ‘आमच्या गावात, आमचं सरकार’, ‘एकाच जिद्द वाढवण बंदर रद्द’, ‘जितेंगे, लढेंगे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

नियमभंगाचा मुद्दा केला उपस्थित

सेवा रस्त्याच्या ५०० मीटर परिसरात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशासह ओव्हरलोड वाहनांची वाहतूक आणि रस्त्याच्या कामातील नियमभंगाचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. सेवा रस्त्यासाठी आणलेले दगड हाताने बाजूला करत आंदोलकांनी गांधीवादी पद्धतीने सविनय कायदेभंग केला.

आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न : निकोले

आंदोलनाला पाठिंबा देताना आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असताना आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून दडपशाहीविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार जनतेला असल्याचे निकोले यांनी सांगितले. भूमिपुत्रांना विनाशकारी बंदर नको, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे ५० पोलीस अधिकारी आणि ४५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, भर उन्हात मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स, भूमिपुत्र तसेच महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.

विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

यावेळी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष विनीत पाटील, मानवेंद्र आरेकर, वाढवण बंदर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर, नॅशनल फिश वर्क फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयवंत तांडेल, कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्यासह विविध आदिवासी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गांधी जयंतीच्या दिवशी झालेल्या या आंदोलनातून वाढवण बंदर रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आली.

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Web Title: Vadhavan port protest civil disobedience agitation in varor dahanu marathi news ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • palghar
  • Protest
  • Vadhavan Port

संबंधित बातम्या

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
1

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था
2

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
3

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

Spain Housing Crisis : गृहनिर्माण संकटाने स्पेनमध्ये संताप; आंदोलकांची सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी
4

Spain Housing Crisis : गृहनिर्माण संकटाने स्पेनमध्ये संताप; आंदोलकांची सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.