Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar Garbage Scam : वसई-विरारमध्ये 957 कोटींचा कचरा घोटाळा? ठाकरे गट आक्रमक; घाईघाईत मंजुरी दिल्याने महापालिका गोत्यात

Vasai Virar Garbage Scam : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील दैनंदिन घनकचरा संकलन आणि रस्ते सफाईसाठी राबविण्यात आलेली तब्बल ९५७ कोटी रुपयांची निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशिष्ट कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आचारसंहितेपूर्वी काही तास आधी घाईघाईने ही निविदा मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे गटाने केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 11:50 AM
पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी? BPCL च्या प्रस्तावावर श्रीनाथ भिमाले म्हणाले...

पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गी? BPCL च्या प्रस्तावावर श्रीनाथ भिमाले म्हणाले...

Follow Us
Follow Us:
  • वसई-विरारमध्ये 957 कोटींचा कचरा घोटाळा?
  • ठाकरे गट आक्रमक
  • घाईघाईत मंजुरी दिल्याने महापालिका गोत्यात
Vasai Virar Garbage Scam : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील दैनंदिन घनकचरा संकलन आणि रस्ते सफाईसाठी राबविण्यात आलेली तब्बल ९५७ कोटी रुपयांची निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निविदा प्रक्रिया विशिष्ट कंत्राटदारांच्या फायद्यासाठी राबवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे ठाकरे गटाने ही प्रक्रिया तातडीने रद्द करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ( Vasai Virar Garbage Scam ) 

Vasai Virar News : पुनर्विकासाच्या 100 हून अधिक फाईल्स रद्द? Social Media वरील मॅसेजने बिल्डर लॉबीत भीतीचं वातावरण

जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि महापौर अजीव पाटील यांना निवेदन दिले. तसेच उपमहापौर मार्शल लोपीस आणि विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांची भेट घेऊन निविदेतील अनियमिततांकडे लक्ष वेधण्यात आले. शहरातील कचरा व्यवस्थापनाचा सध्या बोजवारा उडाल्याचा आरोप करत शिवसेनेने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे म्हटले आहे. यावेळी माजी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, उपजिल्हाप्रमुख उत्तम तावडे, तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे, जिल्हा सचिव आनंद चोरघे, अँजेला तांडेल, सुरेंद्र सिंह, अभिजीत सांगळे, विवेक पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

आवश्यक मनुष्यबळ आणि वाहन संख्या कमी

प्रत्यक्ष कचरा संकलन आणि सफाईच्या कामातही कंत्राटदारांकडून आवश्यक मनुष्यबळ व वाहनांची संख्या कमी केल्याचा आरोप करण्यात आला. महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्या आणि २० विभागांतील सफाईसाठी किमान १ हजार २५७ कामगार, तर कचरा संकलनासाठी १ हजार ३७९ कामगार आवश्यक असताना पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा धोका वाढल्याचा आरोपही करण्यात आला.

दृष्टिक्षेपात सद्यःस्थिती

९५७ कोटीची निविदा
०९ प्रभाग समित्या
२० विविध विभाग
१२५७ सफाईसाठी कामगार
१३७९ कचरा संकलनासाठी कामगार

दोनदा रद्द निविदा प्रशासकीय राजवटीत तिसऱ्यांदा मंजूर

यापूर्वी दोनदा रद्द झालेली निविदा तिस-यांदा प्रशासकीय राजवटीत घाईघाईने मंजूर करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर अवघ्या एका दिवसात निविदा प्रसिद्ध करण्यात आली, पुढे तांत्रिक सल्लागाराचा अहवाल, वाटाघाटी, कंत्राटदारांचे उत्तर आणि मंजुरीची प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तास आधी स्वीकृतीपत्र देण्यात आल्याने प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडणार

या संशयास्पद निविदेची व कर्मचाऱ्यांच्या कपातीची सखोल चौकशी करून विद्यमान कंत्राट रद्द करावे आणि नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी प्रथमेश राऊत यांनी केली. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास महापालिकेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त

Web Title: Vasai virar garbage scam tender alleged thackeray group demands inquiry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • scam
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
1

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
2

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament  वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार
3

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.