Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : कोट्यवधींचा निधी खर्चूनही रस्ते खड्ड्यात! महापालिकेकडून 25 कोटींची ‘मलमपट्टी’; ठेकेदारांवर होणार कारवाई?

Vasai Virar News : वसई-विरार शहरात मुसळधार पावसामुळे मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हे रस्ते सुस्थितीत आणण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवलं आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 11:22 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोट्यवधींचा निधी खर्चूनही रस्ते खड्ड्यात!
  • महापालिकेकडून 25 कोटींची ‘मलमपट्टी’;
  • ठेकेदारांवर कारवाई कधी?
Vasai Virar News : वसई-विरार शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षाला १०० कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यासाठी १७ ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले असून गणेशोत्सवापूर्वी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त

रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश

राज्यातील महापालिकांनी गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कामाला अधिक गती मिळाली आहे.
मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडची अवस्था याचे ठळक उदाहरण ठरत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक, वसई आणि मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला

खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आलेली तात्पुरती डागडुजी पावसात वाहून गेल्याने रस्त्यावर खडी आणि मटेरियल पसरले आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. धानिवबाग, संतोष भुवन, वाकणपाडा, श्रीप्रस्थ रोड, नायगाव-बापाणे, कण्हेर चौकी, बरफपाडा, कोपरी, अग्रवाल, भोयदापाडा, वालीव, एव्हरशाईन अंबाडी, नायगाव-टिवरी तसेच वसई-अर्नाळा भुईगाव मार्गावरही खड्यांचे प्रमाण मोठे आहे. खड्यांमुळे वाहनांचे नुकसान, वाहतुकीचा वेग मंदावणे आणि अपघातांचा धोका वाढला आहे.

निधी खर्चुनही खड्डे कायम

मागील दीड वर्षात रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही पावसाळा सुरू होताच पुन्हा खड्डे पडल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. मुसळधार पाऊस आणि अनेक दिवस साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, केवळ दरवर्षी डागडुजी करण्याऐवजी शहरासाठी दीर्घकालीन आणि दर्जेदार रस्ता आराखडा तयार करण्याची मागणी केली जात आहे.

चार पद्धतींनी होणार दुरुस्ती

महापालिकेने रस्त्यांच्या स्थितीनुसार काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, मास्टिक आणि खडीच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी ज्या ठेकेदारांनी रस्त्यांची कामे केली होती, त्यांच्या कामाच्या ठिकाणी पुन्हा दुरवस्था आढळल्यास त्याच ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेतली जाणार असल्याचे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले.

Palghar Eco Sensitive Zone : वाडा, मोखाड्यातील जमिनींना नव्या पाबंदी? केंद्राचा निर्णय; पालघरमध्ये 126 गावे इको-सेन्सिटिव्ह कक्षेत

Web Title: Vasai virar news municipal corporation allocates 25 crore for potholes repair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Vasai news
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
1

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament  वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार
2

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.