Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : पुनर्विकासाच्या 100 हून अधिक फाईल्स रद्द? Social Media वरील मॅसेजने बिल्डर लॉबीत भीतीचं वातावरण

Vasai Virar News : वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागाशी संबंधित पुनर्विकासाच्या १०० हून अधिक फाईल्सवर स्थगिती किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत. असा एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे महापालिका वर्तुळासह बिल्डर लॉबी आणि रहिवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 11:48 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वसई-विरारमध्ये खळबळ
  • पुनर्विकासाच्या 100 हून अधिक फाईल्स रद्द?
  • मॅसेजने बिल्डर लॉबीत भीतीचं वातावरण
Vasai Virar News : वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागाशी संबंधित पुनर्विकासाच्या १०० हून अधिक फाईल्सना स्थगिती अथवा रद्द करण्यात आल्याचा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळासह बिल्डर लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ( Vasai Virar News ) 

Vasai Virar News : कोट्यवधींचा निधी खर्चूनही रस्ते खड्ड्यात! महापालिकेकडून 25 कोटींची ‘मलमपट्टी’; ठेकेदारांवर होणार कारवाई?

व्हायरल मेसेजनुसार, तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार आणि नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या पुनर्विकासाच्या १०० हून अधिक फाईल्सवर विद्यमान प्रशासनाने कारवाई केली आहे. या फाईल्समध्ये ईडीच्या कारवाईच्या कक्षेत आलेल्या काही वास्तुविशारदांशी संबंधित प्रस्तावांचाही समावेश असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

१०० हून अधिक फाईल्सवर सरसकट कारवाई?

वसई-विरारमधील बेकायदा बांधकाम प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू असतानाच पुनर्विकास प्रकल्पांमधील मंजुरी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या व्हायरल मेसेजची सत्यता आणि त्यामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी आता नागरिक व संबंधितांकडून केली जात आहे. दरम्यान, नक्की १०० हून अधिक फाईल्सवर सरसकट कारवाई झाली आहे का, की केवळ कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्या प्रस्तावांची तपासणी सुरू आहे. अधिकृत खुलासा होईपर्यंत मात्र व्हायरल मेसेजमुळे संभ्रम कायम राहणार आहे.

प्रकल्पांच्या भवितव्याची रहिवाशांना सतावते चिंता

जर मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास फाईल्सना स्थगिती दिली गेली असेल, तर शहरातील जुन्या व धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांनी विकासकांशी करार केले असून, त्यांच्या प्रकल्पांचे भवितव्य काय, असा प्रश्न रहिवाशांपुढे निर्माण झाला आहे.

ईडीच्या कारवाईनंतर तत्कालीन नगररचना उपसंचालक कारागृहात

तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी ईडीच्या कारवाईनंतर गेल्या सव्वा वर्षभरापासून कारागृहात असून, त्यांच्या जामिनाबाबत न्यायालयाने यापूर्वी दिलासा नाकारला आहे. रेड्डी काही महिन्यांपूर्वीच कारागृहात असतानाच सेवानिवृत्त झाले आहेत. तर याच प्रकरणातील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना जामीन मिळाला आहे.

‘कागदपत्रांची कमतरता किंवा त्रुटी असू शकते’

या संदर्भात मी माहिती घेऊन सांगते. कदाचित कागदपत्रांची कमतरता किंवा काही त्रुटी असलेल्या फाईल्सवर कारवाई करण्यात आली असावी, अशी सावध प्रतिक्रिया नगररचना विभागाच्या अधिकारी श्वेता माने यांनी दिली.

NH 48 Encroachment Action Palghar : अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा, 114 अनधिकृत हॉटेल्स अन् ढाब्यांवर हातोडा; प्रशासन ॲक्शन मोडवर

Web Title: Vasai virar news files cancellation viral message creates panic in builders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • ED Action
  • Social Media
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
1

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?
2

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
3

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?
4

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.