कॅनोसा स्कूल CBSE, माणिकपूर येथे ‘व्हिंटेज – सुवर्णयुगाची पुनर्भेट’ या संकल्पनेवर आधारित सामाजिक शास्त्र प्रदर्शन उत्साहात पार पडले. इयत्ता तिसरी ते नववीतील २९७ विद्यार्थ्यांनी ५३ गटांमध्ये सहभागी होत विविध ऐतिहासिक कालखंड, संस्कृती, वास्तू, शोध आणि जीवनशैलीच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. लाल किल्ला, पिरॅमिड्स, ताजमहाल, टायटॅनिक, पाषाणयुग, फोनचा उत्क्रांती प्रवास, व्हिंटेज फॅशन, चलन, फर्स्ट डे कव्हर्स आणि प्राचीन खेळ यांसह विविध विषयांचे सादरीकरण करण्यात आले.