Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : महापालिकेचा मोठा निर्णय? निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये

Vasai Virar News : वाढती महागाई, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या बोजापासून एकाकी निराधार ज्येष्ठ महिलांना दिलासा देण्यासाठी वसई-विरार महापालिकेने अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 31, 2026 | 11:43 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महापालिके घेणार मोठा निर्णय?
  • निराधार महिलांच्या अनुदानात होणार वाढ
  • महासभेत मांडला जाणार प्रस्ताव
Vasai Virar News : वाढती महागाई, घरखर्चाचा वाढता बोजा आणि मालमत्ता व पाणीपट्टीच्या करामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एकाकी निराधार ज्येष्ठ महिलांना दिलासा देण्यासाठी वसई-विरार महापालिका अनुदानात वाढ करणार आहे. सध्या दरमहा ३ हजार रुपये मिळणारे अनुदान आता ३ हजार ४४० रुपये करण्याचा प्रस्ताव सोमवारी म्हणजे दिनांक  ३१ ऑगस्टला होणाऱ्या महासभेत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे या वाढीमुळे महापालिकेवर वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. ( Vasai Virar News )

Vasai Sand Mafia : वैतरणा खाडीत बेकायदा वाळू उपशावर महसूल विभागाची धाड! सक्शन बोट उद्ध्वस्त, 3 हायवा ट्रक जप्त

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६० वर्षांवरील एकाकी व निराधार ज्येष्ठ महिलांना दरमहा तीन हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. मात्र, महागाईसोबतच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वाढलेल्या दरामुळे या रकमेतून दैनंदिन गरजा भागविणे कठीण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

दरम्यान, ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर अजीव पाटील यांनी एकाकी निराधार महिलांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत १०० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र महापालिका अधिनियम, १९४९ मध्ये अशा महिलांना थेट १०० टक्के करसवलत देण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून अनुदानवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

ज्येष्ठ महिलांच्या उपजीविकेसाठी ६ कोटींची तरतूद

आजच्या महासभेत दाखल होणाऱ्या प्रस्तावानुसार, पात्र महिलांच्या अनुदानात मालमत्ता करासाठी २०० रुपये आणि पाणीपट्टीसाठी २४० रुपये, अशी एकूण ४४० रुपयांची मासिक वाढ केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित पात्र महिलांना दरमहा ३ हजार ४४० रुपये मिळतील, ज्या महिलांच्या नावे मालमत्ता असून स्वतंत्र नळजोडणी नाही, त्यांना केवळ मालमत्ता करासाठी २०० रुपयांची वाढीव मदत देण्यात येणार आहे. महापालिकेच्या २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पात एकाकी ज्येष्ठ महिलांच्या उपजीविकेसाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून प्रस्तावित अनुदानवाढीचा खर्च भागविण्यात येणार आहे. आता महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळते का, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

पात्रतेच्या अटी नेमक्या काय?

लाभार्थी महिला ६० वर्षांवरील एकाकी व निराधार असणे आवश्यक आहे. मालमत्ता तिच्या स्वतःच्या नावावर आणि नळजोडणी असलेली असावी. स्वतंत्र मालमत्तेचा वापर केवळ स्वतःच्या निवासासाठी असावा. ती भाड्याने किंवा व्यावसायिक कारणासाठी वापरलेली नसावी. तसेच मालमत्तेचे क्षेत्रफळ एक हजार चौरस फुटांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.

Vasai Environment Conservation : वसईच्या पर्यावरण संवर्धनासाठी नारीशक्ती मैदानात! हरित पट्ट्यात वाढीव FSI ला तीव्र विरोध

Web Title: Vasai virar news municipal corporation proposes hike in subsidy destitute women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Palika
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा
1

ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार स्पर्धा

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament  वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार
2

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.