
ठरलं तर ! Vasai-Virar Mayor Marathon ची तारीख जाहीर, 'या' दिवशी रंगणार स्पर्धा
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शहराबाहेरून येणाऱ्या धावपटूंसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
या स्पर्धेत 42 किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन ही प्रमुख स्पर्धा असणार आहे. याशिवाय 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धांचाही समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी तीन किलोमीटर अंतराची ‘धमाल धाव’ आयोजित करण्यात येणार आहे.
Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन
या मॅरेथॉनसाठी एकूण 58 लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. देशातील अधिक पारितोषिक रक्कम असलेल्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा समावेश होतो. ही पारितोषिके केवळ भारतीय खेळाडूंसाठी खुली असतील. व्यावसायिक आणि हौशी धावपटूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, देशातील आघाडीचे लांब पल्ल्याचे धावपटूही या स्पर्धेत सहभागी होतात.
इतर अनेक मॅरेथॉन स्पर्धांच्या तुलनेत या स्पर्धेची नोंदणी फी कमी ठेवण्यात आली आहे. तसेच शहरा बाहेरून येणाऱ्या सहभागी धावपटूंना विनामूल्य निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्थानिक, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील धावपटूंचा या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग असतो. सैन्यदल, रेल्वे आणि एनआयए विभागातील धावपटूही या स्पर्धेत सहभागी होतात.
भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप
वसई-विरार महापौर मॅरेथॉनला अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची मान्यता प्राप्त आहे. तसेच स्पर्धेच्या धावण्याच्या मार्गाचे मोजमाप करून असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स अँड डिस्टन्स रेसस (AIMS) या संस्थेकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे.
या मॅरेथॉनअंतर्गत १० ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग खेळाडूंसाठीही विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अर्ज www.vvmm.in वर उपलब्ध असणार आहे.